Home /News /technology /

Paytm द्वारे LPG Cylinder बुकिंगवर 3000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक, पाहा काय आहे ऑफर

Paytm द्वारे LPG Cylinder बुकिंगवर 3000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक, पाहा काय आहे ऑफर

दिवसेंदिवस वाढणाऱ्या गॅस सिलेंडरच्या (LPG gas) किंमतींमुळे सर्वसामान्य त्रस्त असताना पेटीएमवर घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर जबरदस्त ऑफर (Paytm offer on LPG booking) देत आहे.

  नवी दिल्ली, 14 डिसेंबर : दिवसेंदिवस वाढणाऱ्या गॅस सिलेंडरच्या (LPG gas) किंमतींमुळे सर्वसामान्य त्रस्त असताना पेटीएमवर घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर जबरदस्त ऑफर (Paytm offer on LPG booking) देत आहे. या ऑफरअंतर्गत घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगवर 3000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक (Cashback) मिळू शकतो. हा कॅशबॅक तीन भागात मिळू शकतो. सिलेंडरच्या बुकिंगसाठी तुम्हाला पेटीएम वॉलेट, यूपीआय किंवा नेटबँकिंगद्वारे पेमेंट करावं लागेल. ही ऑफर केवळ अशा लोकांसाठी आहे, ज्यांनी आतापर्यंत पेटीएमच्या माध्यमातून गॅस बुकिंग केलेलं नाही. जर तुम्ही गॅस सिलेंडर आधी कधी पेटीएमद्वारे बुक केला असेल, तर ही ऑफर तुमच्यासाठी लागू होणार नाही. काय आहे ऑफर - पेटीएमचा वापर करताना पहिल्या तीन गॅस सिलेंडर बुकिंगवर 1000 रुपये प्रति बुकिंगनुसार कॅशबॅक मिळू शकतो. पहिल्या बुकिंगवर हा कॅशबॅक 10 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत असू शकतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या सिलेंडर बुकिंगवर स्क्रॅच कार्डमध्ये 5 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

  तुम्ही गुगल क्रोम वापरता का? केंद्र सरकारने दिलाय 'हा' धोक्याचा इशारा

  काय आहे पात्रता - ही ऑफर केवळ अशा ग्राहकांसाठी आहे, जे Paytm App चा वापर करुन पहिल्यांदा बुकिंग करत आहेत. कमीत-कमी 500 रुपयांच्या बुकिंगवर ही ऑफर वैध मानली जाईल. या ऑफरसाठी तेव्हाच योग्य मानलं जाईल, ज्यावेळी गॅस सिलेंडरचं बुकिंग पेटीएम वॉलेट, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट होईल. पहिलं सिलेंडर बुकिंग, पेमेंट डिसेंबर 2021 पर्यंत करावं लागेल. त्यानंतर ऑफर अॅक्टिवेट होईल आणि पहिलं स्क्रॅच कार्ड युजरला मिळेल. युजरला पुढील दोन बुकिंगदेखील पुढील 2 महिन्यात कराव्या लागतील.

  टेलिकॉम कंपन्यांच्या सततच्या कॉलचा वैताग आलाय? अशी अ‍ॅक्टिवेट करा DND सर्विस

  बुकिंग झाल्यानंतर स्क्रॅच कार्ड मिळेल, जे ओपन करुन तुमचा कॅशबॅक क्लेम करू शकता. स्क्रॅच कार्ड ओपन न झाल्यास, कॅशबॅक अँड ऑफर सेक्शनमध्ये हे पाहता येईल. एकदा ट्रान्झेक्शन झाल्यानंतर जवळपास 24 तासांच्या आत स्क्रॅच कार्ड मिळतं आणि हे 7 दिवसांनंतर एक्सपायर होतं. स्क्रॅच कार्ड ओपन केल्याच्या 72 तासांमध्ये कॅशबॅक पेटीएम वॉलेटमध्ये येतो.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: LPG Price, Paytm, Paytm offers

  पुढील बातम्या