जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Paytm युझर्ससाठी मोठी बातमी; IPL स्कीममुळे Google पुन्हा ban करणार का App?

Paytm युझर्ससाठी मोठी बातमी; IPL स्कीममुळे Google पुन्हा ban करणार का App?

paytm announces ipl cash scheme for cricket league google-imposed-ban-for the same payment-app

paytm announces ipl cash scheme for cricket league google-imposed-ban-for the same payment-app

काही दिवसांपूर्वी Google Play store वरून Paytm अॅप अचानक गायब झालं. गुगलने काही नियमांचा भंग केला म्हणून या अॅपवर बंदी घातली होती. आता पुन्हा तसंच होणार का?

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : काही दिवसांपूर्वी Google Play store वरून Paytm अॅप अचानक गायब झालं. गुगलने काही नियमांचा भंग केला म्हणून या अॅपवर बंदी घातली होती. आता पुन्हा तसंच होणार का? आपल्यापैकी अनेकांच्या मोबाईलमध्ये असलेलं Paytm app काही दिवसांपूर्वी वादात अडकलं होतं. Google India ने पेटीएम अॅप प्ले स्टोअरवरून काढून टाकलं होतं. (Ban on Paytm) पेटीएम अॅपने गुगलच्या नियमांचं (Gambling Guidelines)  उल्लंघन केल्याचा आरोप गुगलने केला होता. अॅप डेव्हलपर्ससाठी घालून देण्यात आलेल्या नियमांपैकी गॅम्बलिंग गाइडलाइन्सचं Paytm ने उल्लंघन केलं असा आरोप या अॅपवर झाला होता. आता पेटीएमने पुन्हा एकदा IPL साठी खास तयार केलेली कॅशबॅक स्कीम आणली आहे. आता ही Google च्या नियमात बसणारी नसेल तर पुन्हा या अॅपवर बंदी येणार का असा प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी पेटीएम अॅप गुगल प्ले स्टोअरवरून अचानक गायब झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. पण गुगलने पेटीएम अॅप नक्की कशामुळे प्ले स्टोअरवरून काढून टाकलं होतं, याचं कारण आता समोर आलं आहे. अॅप डेव्हलरर्सना गुगलने काही नियम घालून दिलेले असतात त्या अटी आणि नियमांमध्ये राहूनच अॅप्समध्ये बदल करणं अपेक्षित असतं. काही दिवसांपूर्वी पेटीएमने आयपीएलशी संबंधित एक ‘कॅशबॅक स्किम’ आपल्या युझर्ससाठी आणली होती. मात्र या स्कीममुळे गुगलने घालून दिलेल्या गॅम्बलिंग गाईडलानन्सचं उल्लंघन झाल्याचा आरोप करत हे अॅप प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google , Paytm
  • First Published :
जाहिरात
जाहिरात