Home /News /technology /

Parcel Management System | रेल्वेने पाठवलेलं लगेज आता काही क्षणात असे करा ट्रॅक!

Parcel Management System | रेल्वेने पाठवलेलं लगेज आता काही क्षणात असे करा ट्रॅक!

indian railway

indian railway

Parcel Management System : पश्चिम मध्य रेल्वेने सामानाचा मागोवा घेण्यासाठी पार्सल व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे. त्यामुळे सामान ट्रॅक करणे सोपे झाले आहे. सामान लोड होताच, बुकिंग केलेल्या व्यक्तीच्या मोबाईलवर एक संदेश येईल आणि इच्छित स्थळी पोहोचल्यानंतरही त्याच माध्यमातून माहिती दिली जाईल.

पुढे वाचा ...
    मुंबई, 2 मार्च : आपण अनेकदा रेल्वेतून सामानाची ने-आण करतो. बऱ्याचदा आपलं लगेज शोधणे किंवा ट्रॅक करणे कठीण काम होतं. यामध्ये सामान गहाळ होण्याचीही भिती होती. मात्र, आता अशी कोणतीच अडचण यापुढे येणार नाही. पार्सल डिपार्टमेंटमध्ये लगेज बुकिंग (Luggage Booking) करणे आता रेल्वेने खूप सोपे केले आहे. पार्सल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच पीएमएसच्या मदतीने आता ग्राहक अगदी सहजपणे त्याचा मागोवा घेऊ शकतात. पार्सल विभागात सामान बुक केल्यानंतर, ट्रेनमध्ये चढल्यापासून ते येईपर्यंतची सर्व माहिती ग्राहकाच्या मोबाइलवर उपलब्ध होईल. एवढेच नाही तर सामान घेऊन जाणाऱ्या ट्रेनचे ठिकाण आणि इच्छित स्थळी पोहोचण्याची वेळ, ही सर्व माहिती आता मोबाईलवर एसएमएसद्वारे उपलब्ध होणार आहे. तुमचे सामान बुक केल्यानंतर आता त्याला ट्रॅक करणे खूप सोपे झाले आहे. वास्तविक, पश्चिम मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांच्या पार्सल विभागात पार्सल व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच पीएमएस सुरू करण्यात आली आहे. जबलपूर हे जबलपूर रेल्वे विभागातील पहिले स्थानक होते जिथे ही यंत्रणा बसवण्यात आली होती. ही प्रणाली स्थापित केल्यानंतर, आता पार्सल बुक करण्याची मॅन्युअल प्रक्रिया काढून टाकून ती PMS शी जोडली गेली आहे. परदेशात MBBS नंतर प्रॅक्टिस भारतात करायची आहे? आधी द्यावी लागेल 'ही' परीक्षा याअंतर्गत पार्सल बुक करण्यापासून ते ट्रेनमध्ये पाठवणे, इच्छित स्थळी पोहोचण्यापर्यंतची माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. पार्सल व्यवस्थापन प्रणालीमध्ये, संगणकाच्या मदतीने सामानासाठी बारकोड तयार केला जातो. हे बार कोड पार्सलवर चिटकवले जातात. त्याची माहिती बुकरला दिली जाते. सामान गाडीत चढताच त्या व्यक्तीला मोबाईलवर माहिती मिळते की त्याचे सामान संबंधित ट्रेनमध्ये भरले गेले आहे. सामान इच्छितस्थळी पोहोचताच त्याची माहिती त्या व्यक्तीच्या मोबाईलवर पाठवली जाते. गरज भासल्यास तो मोबाईल नंबरवरुन स्थानकाशी संपर्क साधू शकतो. इतकेच नाही तर ज्या ट्रेनने सामान जात आहे त्या ट्रेनच्या लोकेशनची माहिती सतत मिळत राहते. पीएम मानधन योजनेत सरकार दर महिना देतंय 1800 रुपये? वाचा काय आहे प्रकरण सध्या सामान बुक करण्यासाठी प्रवाशांना पार्सल विभागात जाऊन त्याचे वजन करून घ्यावे लागते. यानंतर, संबंधित व्यक्तीला पावती दिली जाते आणि त्यानंतर ट्रेनमध्ये चढण्यापासून ते गंतव्यस्थानावर पोहोचण्यापर्यंतच्या सामानाची माहिती त्या व्यक्तीला दिली जात नाही. त्याला ठराविक वेळेत गंतव्य स्थानकावर पोहोचण्याची माहिती दिली जाते. अनेकवेळा पार्सल चुकीच्या ठिकाणीही पोहोचते, त्याचा शोध घेण्यासाठी संबंधित व्यक्ती आणि विभागाच्या अधिकाऱ्यांना खूप प्रयत्न करावे लागतात. कधी कधी त्याला शोधायला महिनेही लागतात. मात्र, आता ही अडचण दूर होणार आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Central railway, Railway track

    पुढील बातम्या