मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

विद्यार्थ्यांनो, परदेशात MBBS नंतर प्रॅक्टिस भारतात करायची आहे? आधी द्यावी लागेल 'ही' परीक्षा; जाणून घ्या डिटेल्स

विद्यार्थ्यांनो, परदेशात MBBS नंतर प्रॅक्टिस भारतात करायची आहे? आधी द्यावी लागेल 'ही' परीक्षा; जाणून घ्या डिटेल्स

 याच परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती

याच परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती

तुम्हीही भारताच्या बाहेर MBBS करण्यासाठी (MBBS in Abroad) जाणार असाल आणि त्यानंतर भारतात प्रॅक्टिस करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 02 मार्च: गेल्या एक दोन नव्हे तर तब्बल 7 दिवसांपासून युक्रेन आणि रशिया या देशांमधील युद्ध (Ukraine Russia War LIVE) सुरु आहे. या युद्धामध्ये (War update 2022) आतापर्यन्त अनेक सैनिकांनी आणि सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. तसंच युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी (Indian Student in Ukraine) अडकले आहेत. अशा विद्यार्थ्यांना परत आणण्याचं काम सध्या भारत सरकार करत आहे. मात्र या युद्धामध्ये एका भारतीय विद्यार्थ्यालाही जीव गमवावा लागला आहे. प्राप्त माहितीनुसार यातील बहुतांश विद्यार्थी हे MBBS म्हणजेच डॉक्टर होण्यासाठी युक्रेनमध्ये (MBBS in Ukraine) गेले होते. मात्र तुम्हीही भारताच्या बाहेर MBBS करण्यासाठी (MBBS in Abroad) जाणार असाल आणि त्यानंतर भारतात प्रॅक्टिस करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. आज आम्ही तुम्हाला याच परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. भारतातील मेडिकल कोर्सेसना प्रवेश (Admission in Medical courses) घेण्यासाठी विद्यार्थ्यांना NEET परीक्षा पास करावी लागते . ही परीक्षा अत्यंत अवघड असते आणि ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे प्रत्येकाला शक्य नसते. अशा परिस्थितीत हे विद्यार्थी युक्रेन आणि रशियासारख्या देशांमध्ये MBBS (how to do MBBS in abroad) करण्यासाठी जातात. तिथली फी त्यांच्या बजेटमध्ये असते आणि त्यांना NEET परीक्षेसारखी प्रवेश परीक्षाही द्यावी लागत नाही. म्हणूनच अनेक विद्यार्थी युक्रेन आणि रशियासारख्या देशांमध्ये शिकण्यासाठी जातात. उमेदवारांनो, UPSC च्या Interview मध्ये कधीच करू नका 'या' चुका; अन्यथा... ही परीक्षा असते आवश्यक परदेशातून वैद्यकीय अभ्यासक्रम केल्यानंतर, भारतात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणे सोपे नाही. यासाठी विद्यार्थ्यांना स्क्रीनिंग टेस्ट (Medical Council of India Screening Test) द्यावी लागते, जी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) द्वारे घेतली जाते. याला FMGE (Foreign Medical Graduates Examination) परीक्षा म्हणतात, ज्याचे पूर्ण स्वरूप विदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षेवर अवलंबून असते. सर्वात कठीण असते परीक्षा FMGE परीक्षा ई म्हणावी तितकी सोपी नसते. ही परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. जून आणि डिसेंबर. परदेशातून वैद्यकीय अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी या परीक्षेत बसतात, परंतु सर्वच यशस्वी होत नाहीत. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. या परीक्षेत तब्बल 80 टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. म्हणूनच ही परीक्षा खूप कठीण मानली जाते. तरुणांनो, आर्थिक अडचणीला घाबरून जाऊ नका; 'हे' पार्ट टाइम जॉब्स करून कमवा पैसे का द्यावी लागते ही परीक्षा परदेशी संस्थांमध्ये अभ्यास करण्यासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही मात्र भारतात यासाठी प्रवेश परीक्षा आहे. परदेशी व्यवस्थेच्या तुलनेत भारताच्या आरोग्य व्यवस्थेच्या रचनेत आणि त्याच्या गरजांमध्ये खूप फरक आहे. भारतातील लोकसंख्या, हंगामी रोग इत्यादींच्या तुलनेत परिस्थिती वेगळी आहे. या सर्व कारणांमुळे FMGE परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक असते.
First published:

पुढील बातम्या