मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /सावधान! तुम्हाला 'ही' लक्षणं तर जाणवत नाहीत ना? स्मार्टफोन्सचा अतिवापर ठरू शकतो धोकादायक

सावधान! तुम्हाला 'ही' लक्षणं तर जाणवत नाहीत ना? स्मार्टफोन्सचा अतिवापर ठरू शकतो धोकादायक

 स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे अनेक शारीरिक व्याधीही जडत आहेत, त्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे अनेक शारीरिक व्याधीही जडत आहेत, त्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे अनेक शारीरिक व्याधीही जडत आहेत, त्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

  मुंबई, 21 फेब्रुवारी: आजच्या काळात स्मार्टफोन (Smartphone) ही अगदी अत्यावश्यक गरज बनली आहे. स्मार्टफोनशिवाय जगण्याची कल्पना करणंदेखील कठीण झालं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आता सर्वांनाच स्मार्टफोनच्या वापराची सवय झाली आहे. कोरोना साथीच्या काळात तर लहान मुलांना शाळेचे धडेदेखील मोबाइलच्या साह्याने गिरवावे लागले आहेत. तर घरून काम करणाऱ्या लोकांनादेखील लॅपटॉपसह (How to avoid over use of Laptop) स्मार्टफोनची आवश्यकता भासते. पेमेंट करणं, शॉपिंग करणं अशी अनेक कामं करता येणं शक्य असल्यानं दैनंदिन आयुष्यात स्मार्टफोनचा वापर अनिवार्य झाला आहे. त्याशिवाय स्मार्टफोनवरून गेम्स, गाणी, ओटीटी असे सगळे मनोरंजनाचे पर्यायही अनुभवता येतात, त्यामुळे स्मार्टफोनचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. मात्र स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे अनेक शारीरिक व्याधीही जडत आहेत, त्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. स्मार्टफोनच्या प्रमाणाबाहेर केल्या जाणाऱ्या वापरामुळे (Over use of smartphones) डोळे, हात, त्वचा, झोप यावर विपरित परिणाम (Affects of over use of mobile) होत आहे. त्याचा शारीरिक स्वास्थावर होणारा परिणाम घातक असून, हा धोका टाळण्यासाठी वेळीच स्मार्टफोन दूर ठेवणं आवश्यक आहे. आजतकनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  झोपेचं चक्र बिघडतं : झोप (Sleep) हा आपल्या जीवनशैलीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. उत्तम आरोग्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर केल्यामुळे झोपेचा कालावधी कमी होतो. त्यामुळे दिवसा उत्साह वाटत नाही, झोप येते. झोप अपुरी झाल्यानं अनेक त्रास निर्माण होतात. यासाठी झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाइल बघणं बंद करणं आवश्यक आहे.

  'जगाला आणखी एका साथीच्या रोगाचा सामना करावा लागेल' बिल गेट्स यांचा इशारा

  ताण वाढू शकतो : मोबाइलवर काहीतरी वाचणं, उशिरापर्यंत फोन बघणं, झोप पूर्ण न होणं या सगळ्यामुळे ताण (Stress) वाढतो. परिणामी आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होतात. आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात.

  डोळ्यांवर विपरित परिणाम : मोबाइलचा सतत वापर केल्यामुळे सर्वात जास्त परिणाम होतो तो डोळ्यांवर (Eyes). डोळे आपल्या शरीरातील अत्यंत संवेदनशील अवयव आहे. मोबाइलच्या स्क्रीनमधून बाहेर पडणाऱ्या निळ्या किरणांमुळे डोळ्यांवर परिणाम होतो.डोकेदुखी, डोळे दुखणं तसंच डोळे कोरडे पडणं असे अनेक त्रास यामुळे होतात. यासाठी स्मार्टफोन वापरताना अधूनमधून ब्रेक घेणं आवश्यक आहे. सतत डोळ्यासमोर स्मार्टफोन असू नये.

  मनगट दुखणं : सतत मोबाइल हातात धरून मनगट (Wrist) दुखण्याचा त्रास होतो. मनगटाच्या स्नायूंवर ताण आल्यानं मनगट दुखणं, बधिर होणं असे त्रास होतात. यातून पुढे कार्पल टनलची गंभीर व्याधी उद्भवू शकते. यामुळे स्मार्टफोन हातात धरण्याचे प्रमाण कमी करणं आवश्यक आहे.

  रेल्वे रुळांच्या मध्ये का टाकली जाते खडी? खूपच रंजक आहे यामागचं कारण

  चेहऱ्यावर मुरूम, पुरळ : स्मार्टफोनच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेवरही विपरित परिणाम होतो. अनेक संशोधनांनी मोबाइलवरील जंतू, जीवाणू यामुळे त्वचेवर मुरूम (Pimples) येण्याचा त्रास उदभवू शकतो असं सिद्ध केलंय. यामुळे अकाली वृद्धत्व येऊ शकतं. त्वचा सुरकुतलेली, निस्तेज दिसू लागते. हा त्रास टाळण्यासाठी मोबाइलचा वापर कमी करणं आवश्यक आहे. तसंच मोबाइल रोज वाईप्सचा वापर करून साफ करणं आवश्यक आहे. तेव्हा अशा आजारांपासून दूर राहायचं असेल तर वेळीच मोबाइलच्या वापराबाबत स्वत:वर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.

  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Smartphones, Technology