मुंबई, 29 मार्च : ओप्पो (Oppo) कंपनीचा ओप्पो के 10 (Oppo K 10) हा स्मार्टफोन आणि एन्को एअर 2 (Enco Air 2) हा ईअरबड्स 23 मार्चला लॉंच झाले आहेत. आता हा स्मार्टफोन आणि ईअरबड्स प्रथमच विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जात आहेत. या दोन्हीची विक्री आज (मंगळवारी, 29 मार्च) दुपारी 12.30 वाजेपासून ओप्पोच्या अधिकृत वेबसाईटवर सुरू होत आहे. नव्या ओप्पो के 10 च्या 6GB+128GB व्हेरियंटची किंमत 14,990 रुपये असून, 8GB+128GB व्हेरियंटची किंमत 16,990 रुपये आहे. तसेच ओप्पोच्या एन्को एअर 2 टीडब्ल्यूएसची किंमत 2499 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर्स ग्राहकांनी ओप्पो के 10 हा स्मार्टफोन एसबीआय डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तसंच ईएमआय (EMI) ट्रान्झॅक्शनवर 2000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच स्टँडर्ड चार्टर्ड आणि बॅंक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डवर हा स्मार्टफोन खरेदी केला तर ग्राहकांना 1000 रुपयांचे डिस्काउंट मिळणार आहे. ओप्पो के 10 या स्मार्टफोन खरेदीवर फ्लिपकार्ट (FlipKart) ग्राहकांना एक वर्षाचे डिस्ने+हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मचं (Disney+Hotstar) सबस्क्रिप्शन आणि तीन महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआय (No Cost EMI) सुविधा देणार आहे. ओप्पो के 10 स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे. तसेच यात 50 मेगापिक्सल मेन कॅमेरा, 33W फास्ट चार्जिंगसारखी फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच एन्को एअर 2 इअर बड्समध्ये (Earbuds) 13.4mmचे डायनॅमिक ड्रायव्हर्स, 24 तास चालणारी लॉंग लाईफ बॅटरी आणि AI नॉईज कॅन्सलेशनसारखे (Noise Cancellation) फीचर्स देण्यात आली आहेत. ओप्पो के 10 मध्ये 6.59 इंचाचा फुल एचडी + 2412×1080 पिक्सल डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. तसेच वरील बाजूस डावीकडे एक होल-पंच कटआउटही आहे. हा फोन अँड्रॉईड 11 बेस्ड ColorOS 11.1 Out Of Box वर चालतो. फोनमध्ये मिळणार 8GBपर्यंत RAM ओप्पो के 10 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 690Soc असून, यात 8GB RAM आणि 128 GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे. हा फोन रॅम एक्सपेंशन टेक्नॉलॉजीलादेखील सपोर्ट करतो. या माध्यमातून idev स्टोरेज वापरून रॅमची क्षमता 5GB पर्यंत वाढवता येते. कॅमेराचा विचार करता, या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. कॅमेरा अॅपमध्ये नाइटस्केप मोड, नाइट फिल्टर, ब्युटिफिकेशन, डॅझल कलर मोड, पॅनोरमा मोड आणि व्हिडिओ फिल्टर सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. दमदार पॉवरसाठी (Power) ओप्पो के 10 मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली असून, ती 33Wच्या SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. धूळ आणि पाण्यामुळे फोन खराब होऊ नये यासाठी यात IP5X आणि IPX4 रेटिंग ही सुविधा देण्यात आली आहे. एन्को एअर 2 इअर बड्समध्ये ग्राहकांना 94ms Low-latency, IPX4 वॉटर रेसिस्टंस रेटींग, AI नॉइझ कॅन्सलेशन, AAC/SBC Codecs सपोर्ट आणि एक USB Type-c पोर्ट देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.