केवळ पाच दिवस बाकी! Maruti Alto स्वस्तात खरेदीची संधी, जाणून घ्या या बंपर ऑफरबाबत

केवळ पाच दिवस बाकी! Maruti Alto स्वस्तात खरेदीची संधी, जाणून घ्या या बंपर ऑफरबाबत

एप्रिलपासून Maruti Alto 800 या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपासून ते अन्य सर्व कार्सच्या किंमती वाढणार आहेत. तत्पूर्वी कंपनीनं मार्च महिन्याअखेरपर्यंत जाहीर केलेल्या डिस्काउंटमध्ये ही कार अगदी स्वस्त किंमतीत घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मार्च : देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी (AUTO OEM) असलेल्या मारुती सुझुकीनं (Maruti Suzuki) नुकतीच 1 एप्रिलपासून आपल्या कार्सच्या किंमती वाढवण्याची (Price Hike) घोषणा केली आहे. कच्च्या मालाच्या (Raw material) किंमती वाढल्यामुळे वाहनांच्या किमती वाढवण्यात येणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. मारुती आपल्या कार्सच्या किंमती किमान 34 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंपनीनं याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

एप्रिलपासून मारुतीच्या अल्टो 800 (Maruti Alto 800) या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपासून ते अन्य सर्व कार्सच्या किंमती वाढणार आहेत. तत्पूर्वी कंपनीनं मार्च महिन्याअखेरपर्यंत जाहीर केलेल्या डिस्काउंटमध्ये ही कार अगदी स्वस्त किंमतीत घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध आहे. अर्थात या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यासाठी केवळ पाच दिवसच मिळणार आहेत.

मारुती अल्टो ऑफर -

Maruti Alto 800 ही मारुती सुझुकीची सर्वाधिक विक्री होणारी कार असून, तिची किंमत 2 लाख 99 हजारांपासून सुरू होऊन 4 लाख 48 हजारांपर्यंत जाते. सध्या या कारवर एकूण 39 हजार रुपयांची सूट (Discount) देण्यात येत आहे. यामध्ये 20 हजार रुपये कन्झ्युमर ऑफर, 15 हजार रुपये एक्स्चेंज बोनस आणि 4 हजार रुपये कार्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिअन्टसवर ही सवलत मिळणार आहे.

(वाचा - घरबसल्या ऑर्डर करा पेट्रोल-डिझेल; ही कंपनी करणार डोर-टू-डोर फ्यूल डिलिव्हरी)

Maruti Alto 800 इंजिन आणि कार्यक्षमता -

मारुती अल्टो 800 मध्ये 796 सीसी क्षमतेचे 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन असून, ते 48 पीएस शक्ती आणि 69 एनएम टॉर्क जनरेट करतं. यात 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स आहे. पेट्रोल कार प्रति लिटर 22 किलोमीटर मायलेज देते, तर सीएनजी कार प्रति 31.59 किलोमीटर मायलेज देते.

आता कंपनी या लोकप्रिय कारचं नवं वेरिएंट आणणार आहे, मात्र अद्याप याबाबत कंपनीनं कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या वर्षाअखेरीस कंपनी अल्टोची नवी आवृत्ती दाखल करण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

(वाचा - पुढील वर्षापासून बदलणार टोल कलेक्शनची प्रक्रिया, तुमच्यावर काय परिणाम होणार)

किंमत -

कमी किंमतीत उपलब्ध होणारी मारुती अल्टो 800 ही कार सर्वसामान्य नागरिकांच्या पसंतीची असून, या कारची किंमत (एक्स शोरूम दिल्ली) 2 लाख 99 हजारांपासून सुरू होऊन 4 लाख 48 हजारांपर्यंत जाते. सवलतीच्या किंमतीत ही कार खरेदी करायची असेल तर फक्त मार्च अखेरपर्यंतच संधी आहे. एप्रिलपासून अल्टोची किंमत वाढणार आहे.

First published: March 26, 2021, 7:00 PM IST

ताज्या बातम्या