जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Online Shopping Apps: ऑनलाईन खरेदी करायचीये? ही आहेत बेस्ट 5 शॉपिंग अ‍ॅप्स

Online Shopping Apps: ऑनलाईन खरेदी करायचीये? ही आहेत बेस्ट 5 शॉपिंग अ‍ॅप्स

Online Shopping Apps: ऑनलाईन खरेदी करायचीये? ही आहेत बेस्ट 5 शॉपिंग अ‍ॅप्स

Online Shopping Apps: ऑनलाईन खरेदी करायचीये? ही आहेत बेस्ट 5 शॉपिंग अ‍ॅप्स

Best Online Shopping Apps: ऑनलाईन वस्तूंची खरेदी करण्यासाठी तुम्हाला काही शॉपिंग अ‍ॅपची मदत होते. आज आपण भारतातील प्रसिद्ध शॉपिंग अ‍ॅपची माहिती घेणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑगस्ट: भारतामध्ये गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. अनेक लोक विविध प्रकारच्या गोष्टींची ऑनलाईन खरेदी करत असतात. विविध ब्रँडच्या कपडे, शूज, स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, किचनमधील वस्तू, शालेय वस्तू अशा कित्येक गोष्टी तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता येतात. ऑनलाईन वस्तूंची खरेदी करण्यासाठी तुम्हाला काही शॉपिंग अ‍ॅपची मदत होते. आज आपण भारतातील प्रसिद्ध शॉपिंग अ‍ॅपची (Best Online Shopping Apps) माहिती घेणार आहोत. 1.स्नॅपडील (Snapdeal)- स्नॅपडील हे प्रसिद्ध ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅप आहे. स्नॅपडीलच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता. आतापर्यंत 10 कोटींहून अधिक लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केलं आहे. या अपला 4.6 स्टार रेटींग मिळालं आहे. 2. मिंत्रा (Myntra-Fashion Shopping App)- मिंत्रा हे अतिशय प्रसिद्ध असं फॅशन शॉपिंग अ‍ॅप आहे. विविध ब्रँडचे फॅशनेबल कपडे, शूज मिंत्रावर उपलब्ध असतात.10 कोटींपेक्षा जास्त लोक हे अ‍ॅप वापरतात. 3. फ्लिपकार्ट (Flipcart online shopping App)- भारतातील सर्वात प्रसिद्ध शॉपिंग अ‍ॅपपैकी एक म्हणजे फ्लिपकार्ट. कपड्यांपासून ते स्मार्टफोनपर्यंत आणि किचनमधील वस्तूंपासून ते विविध उपकरणांपर्यंत अनेक गोष्टी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. 10 कोटींपेक्षा जास्त लोकांनी हे अप डाउनलोड केलं आहे. हेही वाचा-   Mobile Charging: सुपरफास्ट चार्ज होईल स्मार्टफोनची बॅटरी! फक्त फॉलो करा या टिप्स

4.अमेझॉन (Amazon India Shop)-

भारतातील सर्वात प्रसिद्ध शॉपिंग अ‍ॅपपैकी एक म्हणजे अमेझॉन..देशातील लाखो लोक दररोज अमेझ़ॉनवरून शॉपिंग करत असतात. स्मार्टफोन, कपडे, इलेक्ट्रीक उपकरणं, शूज, गृहोपयोगी वस्तू, पुस्तकं अशा कित्येक गोष्टी अमेझॉनवरून खरेदी करता येतात. 10 कोटींपेक्षा अधिक लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केलं आहे. 5. अजिओ (Ajio online Shopping App)- रिलायन्स रिटेल लिमिटेडचं हे अ‍ॅप आत्तापर्यंत 10 कोटींहून अधिक लोकांनी डाउनलोड केलं आहे. फॅशनशी संबंधित एकसे बढकर एक गोष्टी आपल्याला या अ‍ॅपच्या माध्यमातून खरेदी करता येतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात