Home /News /technology /

एक नंबर Offer..!OnePlus 9RT 5G कमी किंमतीत, जाणून घ्या Discount Price

एक नंबर Offer..!OnePlus 9RT 5G कमी किंमतीत, जाणून घ्या Discount Price

OnePlus 9RT 5G फोन अगदी कमी किमतीत तुमचा होऊ शकतो. OnePlus कंपनी आपला लोकप्रिय स्मार्टफोन OnePlus 9RT 5G (8GB + 128GB) बंपर डिस्काउंटसह देत आहे.

नवी दिल्ली, 15 एप्रिल: तुम्ही स्वस्तात मस्त म्हणजेच किफायतशीर फोन (Phone) खरेदी करण्याच्या विचारात असाल तर सध्या एक भन्नाट आणि खिशाला परवडणारी ऑफर (Offer) सुरू आहे. OnePlus 9RT 5G फोन अगदी कमी किमतीत तुमचा होऊ शकतो. OnePlus कंपनी आपला लोकप्रिय स्मार्टफोन OnePlus 9RT 5G (8GB + 128GB) बंपर डिस्काउंटसह देत आहे. हा फोन सध्या Amazon India वर 42,999 रुपयांच्या किंमतीसह लिस्टेड आहे. परंतु तुम्ही 4,000 रुपयांच्या डिस्काउंट नंतर तो 38,999 रुपयांना खरेदी करू शकता. 4 हजार रुपयांच्या डिस्काउंटसाठी, तुम्हाला SBI च्या क्रेडिट कार्डने पेमेंट करावं लागेल. कंपनी फोनवर 16,550 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देत आहे. जर तुम्हाला तुमच्या जुन्या फोनची पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली तर SBI कार्डवरून पेमेंट करून तुम्ही OnePlus 9RT 5G खूप स्वस्तात म्हणजे 20,550 रुपयांत घरी आणू शकता. तुम्ही हा फोन एचएसबीसी किंवा स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केला तर तुम्हाला आणखी 2 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या संदर्भात लाईव्ह हिंदूस्थानने वृत्त दिलंय. वनप्लस 9RT 5G चे फीचर आणि स्पेसिफिकेशन काय आहेत? या फोनमध्ये, कंपनी 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.62-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देत आहे. फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजसह येतो. प्रोसेसर म्हणून तुम्हाला यामध्ये स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट मिळेल. फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागच्या बाजूला एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे (Triple Camera) देण्यात आले आहेत. यामध्ये 50-मेगापिक्सेलच्या प्रायमरी सेन्सरसह 8-मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सल मॅक्रो शूटरचा समावेश आहे. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. व्लादिमीर पुतिन करणार Nuclear Attack?, CIA प्रमुखांनी दिली मोठी अपडेट इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचं झालं तर, फोन Android 11 वर आधारित लेटेस्ट Oxygen OS वर काम करतो. एकंदरीत OnePlus 9RT 5G हा फोन सध्या बंपर डिस्काउंटसह (Discount) मिळतोय. त्यामुळे तुम्ही फोन घेण्याच्या विचारात असाल आणि तुमचं बजेट असेल तर तुम्ही हा फोन घेऊ शकता. सर्वच डिस्काउंट मिळवण्यास पात्र असाल तर हा फोन तुम्ही अर्ध्या किमतीत घरी आणू शकता.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: One plus 9

पुढील बातम्या