मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /नव्या कार खरेदीवर बंपर डिस्काउंट,'या' 5 कार्सवर मिळतेय तब्बल 3 लाखांपर्यंतची सूट

नव्या कार खरेदीवर बंपर डिस्काउंट,'या' 5 कार्सवर मिळतेय तब्बल 3 लाखांपर्यंतची सूट

देशातल्या पाच आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांनी काही मॉडेल्सवर तब्बल 3 लाखांपर्यंत सवलत जाहीर केली आहे.

देशातल्या पाच आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांनी काही मॉडेल्सवर तब्बल 3 लाखांपर्यंत सवलत जाहीर केली आहे.

देशातल्या पाच आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांनी काही मॉडेल्सवर तब्बल 3 लाखांपर्यंत सवलत जाहीर केली आहे.

नवी दिल्ली, 1 जून : जगभरात पसलेल्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे (Corona Virus Pandemic) सगळ्या जगाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लॉकडाउन (Lockdown) करण्यात आल्यानं अनेक उद्योग-धंदे बंद पडले आहेत. अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांचं उत्पन्न घटलं असून, चैनीच्या गोष्टी खरेदी करण्यापेक्षा पैसे साठवण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. घर, वाहनं, दागिने अशा मोठ्या खरेदीचं प्रमाण कमी झालं असून, मागणी घटली आहे. आता कोरोनावरील लस आल्यानं थोडा दिलासा मिळाल्यानं हळूहळू अर्थचक्र सावरत आहे. त्यामुळे लोकांना खरेदीसाठी प्रवृत्त करण्यासाठी कंपन्या अनेक सवलती आणत आहेत.

'झी न्यूज'नं दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना साथीच्या काळात मोठा फटका बसलेल्या वाहन उत्पादकांनी (Auto Companies) कार खरेदीवर मोठमोठ्या सवलती जाहीर केल्या असून, लोकांना कमी किमतीत कार खरेदीचं आवाहन केलं जात आहे. त्यामुळे कार खरेदीची इच्छा असणाऱ्या ग्राहकांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. देशातल्या पाच आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांनी काही मॉडेल्सवर तब्बल 3 लाखांपर्यंत सवलत जाहीर केली आहे.

यामध्ये महिंद्रा आणि महिंद्राचं (Mahindra and Mahindra) नाव आघाडीवर आहे. कंपनीने आपली प्रीमियम एसयूव्ही ‘Alturas G4’वर तब्बल 2 लाख 20 हजारांची रोख सवलत, 50 हजार रुपयांपर्यंतचा एक्स्चेंज बोनस, 11 हजार 500 रुपये कॉर्पोरेट सवलत आणि 20 हजार रुपयांच्या मोफत अ‍ॅक्सेसरीज अशी घसघशीत सवलत दिली आहे. या कारची किंमत (एक्स-शोरूम) 28.74 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 31.74 लाखांपर्यंत जाते. 2.2 लिटरचे 4 सिलेंडर डिझेल इंजिन या कारला असून, ती 7 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येते.

महिंद्रा एक्सयूव्ही 500 (Mahindra XUV500) या कारवरदेखील जवळपास एक लाख रुपयांची सवलत दिली गेली आहे. कारच्या व्हॅरिएंटनुसार 51 हजार 500 रुपयांपर्यंतची रोख सवलत, 25 हजार 500 रुपयांचा एक्स्चेंज बोनस आणि 6 हजार 500 रुपयांची कॉर्पोरेट सवलत उपलब्ध आहे. तसंच 15 हजार रुपयांपर्यंतच्या मोफत अ‍ॅक्सेसरीजही दिल्या जात आहेत. या कारची किंमत (एक्स-शोरूम) 15.52 लाख रुपयांपासून 20.03 लाखांपर्यंत जाते.

(वाचा - बाबो! या घडाळ्याच्या किंमतीत गाडी घेऊ शकाल, कार कंपनी Buggati चं Smartwatch लाँच)

हुंदाईने (Hyundai)भारतात आपल्या कोना (Kona) या इलेक्ट्रिक कारवर (Electric Car) दीड लाख रुपयांची रोख सवलत दिली आहे. फुल चार्जमध्ये 452 किलोमीटर अंतर जाणारी ही इलेक्ट्रिक कार 9.7 सेकंदात ताशी 0 ते 100 किलोमीटर एवढा वेग घेऊ शकते. या कारची किंमत (एक्स-शोरूम) 23.77 लाख रुपयांपासून 24.96 लाख रुपयांपर्यंत आहे.

Renault कंपनीनं आपल्या लोकप्रिय डस्टर (Duster) कारच्या व्हॅरिएंटनुसार विविध सवलत दिल्या आहेत. सर्वाधिक सवलत 1.3 लिटर टर्बो RXS व्हॅरिएंटवर आहे. यावर 30 हजार रुपयांची रोख सवलत, 30 हजार रुपयांचा एक्स्चेंज बोनस, 15 हजार रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस आणि 30 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलत अशी एक लाख रुपयांची सवलत दिली गेली आहे. या कारची किंमत 9.73 लाखांपासून 14.12 लाख रुपयांपर्यंत आहे.

निसानने (Nissan) 9.49 लाख रुपयांपासून ते 14.64 लाख रुपयांपर्यंत किंमत असललेल्या किक्स (Kicks) या आपल्या एसयूव्हीवर 75 हजार रुपयांपर्यंतची सूट जाहीर केली आहे. यामध्ये 20 हजार रुपयांपर्यंत रोख सवलत, 50 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस आणि 5 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त बोनसचा समावेश आहे.

First published:
top videos

    Tags: Anand mahindra, Tech Mahindra