मुंबई, 27 डिसेंबर: पूर्वी फक्त सणासुदीच्या काळात सेल आणि ऑफर्स दिल्या जात. मात्र, आता वर्षभर सिझननुसार विंटर कलेक्शन सेल, मॉन्सून सेल, न्यू ईयर सेल, ईयर एन्ड सेल यासारखे विविध सेल सुरू असतात. या सेल्सच्या माध्यमातून विविध ऑनलाईन शॉपिंग साईट्स (Online shopping sites)आणि अॅप्स (Apps) ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्या ऑफर्स देण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांच्या ग्राहकांची संख्या वाढेल. ऑनलाईन शॉपिंग करताना मोठ्या प्रमाणात डिस्काउंट आणि घरपोच डिलिव्हरी मिळत असल्यानं ग्राहकांचासुद्धा त्याकडे जास्त कल आहे. सध्या सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची लगबग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शॉपिंग अॅप फ्लिपकार्टनं (Flipkart) आपल्या ग्राहकांसाठी स्मार्टफोन्स ईयर एन्ड सेल (Flipkart Year End Sale) सुरू केला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सची लेटेस्ट रेंज उपलब्ध करून देण्यात आली आहे. फ्लिपकार्टच्या ईयर एन्ड सेलमध्ये रियलमीचा जीटी मास्टर एडिशन (GT Master Edition) हा फोन धमाकेदार डिस्काऊंटसह 5 हजार 449 रुपयांना मिळत आहे. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
26 डिसेंबर (रविवार) रोजी सुरू झालेला हा सेल 30 डिसेंबरपर्यंत (गुरुवार) चालणार आहे. सेल दरम्यान अॅपल (Apple), सॅमसंग (Samsung), ओप्पो (Oppo), शाओमी (Xiaomi) आणि रियलमी (Realme) या कंपन्यांचे स्मार्टफोन एकदम स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी आहे. रियलमीच्या जीटी मास्टर एडिशनवर सर्वात जास्त सवलत मिळत आहे. 6 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेज व्हेरियंट असलेल्या रियलमी जीटी मास्टर एडिशनची लॉन्च प्राईज 26 हजार 999 रुपये इतकी आहे. मात्र, फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन 25 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच त्यावर हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. याशिवाय फोनसोबत बँक ऑफर्स (Bank Offers) आणि एक्सचेंज ऑफरदेखील (Exchange Offer) मिळत आहे. त्यामुळं फोनची किंमत आणखी कमी होण्यास मदत होत आहे.
Electric Scooter चालवताय? या गोष्टी लक्षात ठेवाच
रियलमी जीटी मास्टरवर 4 हजार रुपयांची अतिरिक्त ऑफर उपलब्ध आहे. जर तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डनं बिलं भरलं तर तुम्हाला ही चार हजार रुपयांची सूट मिळेल. जर अॅक्सिस बँकेच्या (Axis Bank) क्रेडिट कार्डनं बील भरलं तर तुम्हाला 1 हजार 100 रुपयांचा इन्सन्ट डिस्काऊंट मिळेल. म्हणजेच फोनची किंमत 20 हजार 899 रुपये होते. याशिवाय फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.
रियलमी जीटी मास्टर एडिशनवर15 हजार 450 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केलात तर तुम्हाला मोठी सूट मिळू शकते. जुन्या फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल अलीकडच्या काळातील असेल तरच 15 हजार 450 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळेल.
वरील सर्व ऑफर मिळवण्यात तुम्ही यशस्वी झालात तर फोनची किंमत 5 हजार 449 रुपये होते. याचाच अर्थ 26 हजार 999 रुपयांचा लेटेस्ट फोन तुम्हाला केवळ साडेपाच हजार रुपयांमध्ये मिळू शकतो. जर तुम्ही नवीन वर्षात नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टच्या या ईयर एन्ड सेलचा लाभ घेण्यास हरकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Flipkart, Online shopping, Smartphones, Techonology