मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता फास्टॅगच काय, टोल नाकेही होणार हद्दपार, 'या' नव्या टेक्नॉलॉजीने होणार टोल वसुली!

आता फास्टॅगच काय, टोल नाकेही होणार हद्दपार, 'या' नव्या टेक्नॉलॉजीने होणार टोल वसुली!

जीपीएसवर आधारित टोल कर कलेक्शन सिस्टीम अनेक युरोपीय देशांमध्ये पूर्वीपासून लागू आहे. तिथं ही सिस्टीम यशस्वी झाल्याने तिचा वापर आता भारतातही करण्यात येणार

जीपीएसवर आधारित टोल कर कलेक्शन सिस्टीम अनेक युरोपीय देशांमध्ये पूर्वीपासून लागू आहे. तिथं ही सिस्टीम यशस्वी झाल्याने तिचा वापर आता भारतातही करण्यात येणार

जीपीएसवर आधारित टोल कर कलेक्शन सिस्टीम अनेक युरोपीय देशांमध्ये पूर्वीपासून लागू आहे. तिथं ही सिस्टीम यशस्वी झाल्याने तिचा वापर आता भारतातही करण्यात येणार

    मुंबई, 08 ऑगस्ट : महामार्ग, एक्स्प्रेस वेवरून चारचाकीने (Four Wheeler) प्रवास करताना आपल्याला टोल (Toll) द्यावा लागतो. पूर्वी टोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असत. यामुळे वाहनचालकांची गैरसोय आणि वाहतूक कोंडी होत असे. या समस्येवर पर्याय म्हणून केंद्र सरकारने फास्टॅगच्या (Fast Tag) माध्यमातून टोल जमा करण्यास सुरुवात केली. ही सुविधा सुरळीत होत असतानाच आता सरकार टोल वसुलीसाठी एका नवीन प्रक्रियेवर काम करत आहे. पुढील काळात जीपीएसवर आधारित टोल वसुली करण्याचं सरकारचं नियोजन आहे.  महामार्गावर जितकं अंतर वाहनचालक कापेल, तेवढाच टोल त्याच्याकडून वसूल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या सुविधेमुळे टोल नाक्यांची (Toll Plaza) गरज संपुष्टात येणार असून, टोल नाके बंद होणार आहेत. सरकार सध्या टोल कर वसुलीसाठी नव्या टेक्नॉलॉजीच्या (Technology) वापराबाबत काम करत आहे. जर ही टेक्नॉलॉजी प्रत्यक्षात आली तर फास्टॅग सिस्टिम कालबाह्य ठरेल. या वर्षी मार्च महिन्यात केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी येत्या एक वर्षात देशातले सर्व टोल नाके हटवण्यात येतील, अशी माहिती लोकसभेत दिली होती. या अनुषंगाने सध्या नव्या टेक्नॉलॉजीवर वेगात काम सुरू आहे, असं वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिलं आहे. (केसरियानंतर ब्रह्मास्त्रमधील आणखी एका गाण्याने लावलं प्रेक्षकांना वेड; देवा देवाच्या चालीवर चाहते तल्लीन) केंद्र सरकार आगामी काळात जीपीएस सॅटेलाइट टेक्नॉलॉजीच्या (GPS satellite technology) मदतीनं टोल वसुली करण्याची तयारी करत आहे. सध्या हे काम फास्टॅगच्या माध्यमातून होत आहे. गाडी जेव्हा टोल प्लाझातून जाते, तेव्हा प्लाझावर लावण्यात आलेलं आरएफआयडी यंत्र गाडीच्या पुढच्या काचेवर लावलेल्या फास्टॅग स्टीकरच्या माध्यमातून वाहनचालकाच्या टोलचे पैसे कापून घेतं. 'उपग्रहाच्या आधारे चालणारी टोल कलेक्शन सिस्टीम सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवली जात आहे,' अशी माहिती सूत्रांनी दिली. नव्या टेक्नॉलॉजीमध्ये तुमची कार जितकं अंतर कापेल त्याच आधारावर टोलची रक्कम कापली जाईल. यासाठी दोन प्रकारच्या टेक्नॉलॉजींवर सध्या काम सुरू आहे. पहिल्या टेक्नॉलॉजीनुसार, वाहनात जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली (GPS Tracking System) असेल. या प्रणालीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही महामार्गावरून प्रवास करत असाल तेव्हा सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे वाहन मालकाच्या बॅंक खात्यातून थेट टोलचे पैसे कापले जातील. दुसऱ्या टेक्नॉलॉजी नुसार, तुमच्या वाहनाच्या नंबर प्लेटच्या (Number Plate) माध्यमातून टोल वसूली होईल. नंबर प्लेटच्या माध्यमातून टोल वसुलीसाठी एक कम्प्युटराईज्ड सिस्टम असेल. त्यातील सॉफ्टवेअरच्या मदतीनं टोल वसूली होईल. या तंत्रानुसार, ज्या ठिकाणाहून गाडी महामार्गावर प्रवेश करेल, तिथं तिच्या माहितीची नोंद होईल. त्यानंतर ज्या पॉईंटवरून गाडी महामार्गाबाहेर जाईल, तिथंही अशाच प्रकारची नोंद होईल. या दरम्यान संबंधित वाहनाने महामार्गावरील जितकं किलोमीटर अंतर कापलं आहे, त्या हिशेबानुसार वाहन मालकाच्या बॅंक खात्यातून टोलची रक्कम कापली जाईल. (होम लोनचं ओझं 'या' मार्गाने कमी करा, वाढलेल्या व्याजदरांनंतरही लवकर संपेल कर्ज) टोल वसुलीच्या या नव्या तंत्रज्ञानाबाबत मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं की, 'टोल वसुलीसाठी टोल नाक्यांऐवजी आता जीपीएसवर आधारित टोल कलेक्शन सिस्टीम बसवण्यात येईल. महामार्ग किंवा एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या वाहनांकडून जीपीएस इमेजिंगच्या मदतीनं टोल कर वसूल करण्यात येईल. जीपीएसवर आधारित टोल कर कलेक्शन सिस्टीम अनेक युरोपीय देशांमध्ये पूर्वीपासून लागू आहे. तिथं ही सिस्टीम यशस्वी झाल्याने तिचा वापर आता भारतातही करण्यात येणार आहे. सध्याच्या नियमांनुसार टोलचा हिशोब करण्यासाठी महामार्गावरील एका टप्प्याचं अंतर ग्राह्य धरलं जातं. हे अंतर सहसा 60 किलोमीटर असतं. हे अंतर कमी किंवा जास्त असेल तर त्यानुसार टोलची रक्कम बदलते. परंतु, 60 किलोमीटर हे अंतर मानक मानलं जातं. त्याच मार्गावर एखादा पूल, कल्व्हर्ट किंवा ओव्हरब्रिज असेल तर टोलची रक्कम बदलते. पण नव्या सिस्टीमनुसार, तुमची कार जितकं अंतर कापेल त्याच आधारावर टोलची रक्कम कापली जाईल', असं गडकरी यांनी सांगितलं.
    First published:

    पुढील बातम्या