जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Nokia चा स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत, Amazon ची ऑफर

Nokia चा स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत, Amazon ची ऑफर

Nokia चा स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत, Amazon ची ऑफर

तीन कॅमेरे, फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या मोबाईलवर अॅमेझॉनने मोठी ऑफर दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नोकिया कंपनीकडून बजेट फोनवर जबरदस्त ऑफर दिली जात आहे. ग्राहकांना अॅमेझॉनवरून Nokia 4.2 वर मोठी सूट दिली जात आहे. अॅमेझॉनने दिलेल्या माहितीनुसार या फोनवर 6 हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे. फोनची मूळ किंमत 12 हजार 999 इतकी आहे. मात्र ऑफरमध्ये हा फोन फक्त 6 हजार 999 रुपयांना खरेदी करता येईल. Nokia 4.2  ची किंमत कमी झाली असल्याने ग्राहक याकडे आकर्षित होत आहेत. यामध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आहे. नोकिया 4.2 स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 9.0 पाय व्हर्जन आहे. ड्युअल सिम सपोर्ट असून 5.71 इंचाचा वॉटर ड्रॉप नॉच एचडी प्लस डिस्प्ले आहे. वाचा : इंटरनेट नसेल तेव्हाही वापरा YouTube, Gmail आणि Google Map क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर असलेल्या फोनमध्ये 3 जीबी रॅम आहे. 32 जीबी इंटरनल स्टोरेज यामध्ये आहे. या फोनमध्ये 13 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा असून 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 3 हजार एमएएच असून फिंगरप्रिंट सेन्सरसुद्धा आहे. वाचा : Whatsapp Uninstall किंवा चॅट क्लिअर केल्यानंतर Backup कसा घ्यायचा?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: nokia
  • First Published :
जाहिरात
जाहिरात