Home /News /technology /

आता ड्रोनमधून होणार औषध आणि Vaccine ची Delivery, देशाच्या इतिहासातील क्रांतीकारक प्रयोग

आता ड्रोनमधून होणार औषध आणि Vaccine ची Delivery, देशाच्या इतिहासातील क्रांतीकारक प्रयोग

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा ड्रोनमधून (Drone) औषधे (Medicines) आणि लसी (vaccines) पोहोचवण्याचा पहिला प्रयोग (First experiment) गुरुवारपासून सुरु होणार आहे.

    हैदराबाद, 8 सप्टेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा ड्रोनमधून (Drone) औषधे (Medicines) आणि लसी (vaccines) पोहोचवण्याचा पहिला प्रयोग (First experiment) गुरुवारपासून सुरु होणार आहे. तेलंगणानं (Telangana) प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सुरू करण्याचं निश्चित केलं असून 9 आणि 10 सप्टेंबर हे दोन दिवस या प्रयोगाची अंमलबजावणी कऱण्यात येणार आहे. काय आहे प्रकल्प? Medicines from the sky (MFTS) हा तेलंगणा राज्य सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रयोग आहे. स्काय एअर मोबिलिटी नावाच्या कंपनीनं यासाठी पुढाकार घेतला असून हा प्रयोग राबवणारं तेलंगणा हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे. या प्रयोगाच्या पहिल्या 500 ते 700 मीटर उंचीवरून ड्रोन उडणार असून उघड्या डोळ्यांनी ते दिसू शकणार आहेत. त्यानंतरच्या टप्प्यात मात्र मानवी डोळ्यांनी जेवढ्या उंचीपर्यंतचे घटक पाहता येतात, त्यापेक्षा अधिक उंचीवरून हे ड्रोन उडवले जाणार असून या प्रकाराला BVLOS (beyond visual line of sight) असं म्हटलं जातं. अशी होणार डिलिव्हरी स्काय एअर आणि ब्लू डार्ट या कंपन्यांनी एकत्रितपणे हा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ड्रोनमार्फत औषधे आणि लसी पोहोचवण्याची जबाबदारी स्काय एअर कंपनीची असेल. तर ड्रोनमधून हे साहित्य निर्धारित पत्त्यावर पोहोचवण्याचं काम ब्लू डार्ड कंपनी करणार आहे. हे वाचा -मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी Good News, मोदी सरकारने वाढवली या रब्बी पिकांची MSP अशी होणार अंमलबजावणी गुरुवार आणि शुक्रवारी कमी उंचीवरून ड्रोन उडणार असून ते कमी अंतर पार करतील. त्यामुळे नागरिकांना आकाशातून हे ड्रोन उडताना पाहता येईल. त्यानंतर मात्र BVLOS यंत्रणेचा वापर करून अधिक उंचीवरून ड्रोन उडणार आहे. 11 सप्टेंबरनंतर 9 ते 11 किलोमीटर अंतर कापण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. ज्या भागात रस्ते किंवा रेल्वे सुविधा नाही, अशा दुर्गम भागात जलद औषधं पोहोचवण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. यामुळे डोंगराळ आणि दुर्गम भागात मदत पोहोचवणं आणि त्याचबरोबर आपतकालीन परिस्थिती जलद मदत पोहोचवणं शक्य होणार आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Drone shooting, Medicine, Telangana, Vaccine

    पुढील बातम्या