मुंबई, 7 ऑगस्ट : भारतात लवकरच 5G नेटवर्क सुविधा उपलब्ध होणार आहे. एअरटेल आणि जिओ ऑगस्टच्या अखेरीस 5G नेटवर्क डिप्लॉय करणे सुरू करू शकतात. एअरटेलने यासाठी Ericsson, Nokia आणि Samsung सोबत 5G नेटवर्क करार केले आहेत. 5G नेटवर्क लोकांचा काम करण्याचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. अनेकजण 5G वापरण्यासाठी उत्सुक आहेत. पण, आपल्या स्मार्टफोनमध्ये 5 जी चालेल का? की स्मार्टफोन बदलावा लागेल? याचे रिचार्ज 4G प्रमाणे असतील की जास्त पैसे मोजावे लागतील? असे अनेक प्रश्न सध्या तुमच्या मनात असतील. चला उत्तरे जाणून घेऊ.
4G नेटवर्कपेक्षा 5G कसे वेगळे आहे?
मोबाइल नेटवर्क हे 5G वायरलेस नेटवर्कसाठी जागतिक स्टँडर्ड आहे, जे 4G नेटवर्कच्या क्षमता सुधारेल. 5G ची कनेक्टिव्हिटी खूप वेगवान असेल. गेमिंग आणि मनोरंजनाच्या बाबतीतही ते उत्कृष्ट ठरणार आहे. 5G चा वेग 4G च्या वेगापेक्षा 100 पट जास्त असू शकतो. याद्वारे तुम्ही फक्त 10 सेकंदात 2GB चित्रपट डाउनलोड करू शकाल.
तुमच्या स्मार्टफोनमध्ये 5G चालेल का?
तुमच्या 4G मोबाईलमध्ये 5G नेटवर्क काम करणार नाही. यासाठी 5G फोन असणे आवश्यक आहे. जर वायफाय 5G स्पीडमध्ये चालत असेल आणि तुम्ही तुमचा मोबाइल त्याला जोडला असेल तर तुम्हाला 5G स्पीड मिळू शकेल. तुमचा फोन 5G ला सपोर्ट करतो की नाही हे जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या फोनची सेटिंग्ज तपासणे. यासाठी अँड्रॉइड फोनवर जाऊन सेटिंगमध्ये जा. त्यानंतर नेटवर्क आणि इंटरनेट पर्यायावर टॅप करा आणि मोबाइल नेटवर्कवर करा. नंतर पसंतीच्या नेटवर्क प्रकारावर क्लिक करा. तुम्हाला 2G, 3G, 4G आणि 5G दिसेल. जर 5G लिस्टेड असेल तर तुमच्या फोनमध्ये 5G सपोर्ट करेल.
उबरची नवीन सुविधा; आता व्हॉट्सअॅपवरही बुक करता येणार कॅब
तर तुम्हाला नेटवर्क बदलावं लागेल
Jio आणि Airtel देशातील काही प्रमुख शहरांमधून 5G सेवा सुरू करणार आहेत. 5G सेवा ऑगस्ट 2022 च्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सध्यातरी 5G नेटवर्कचा अनुभव घेण्यासाठी तुमच्याकडे जिओ आणि एअरटेलला पर्याय नाही. तुम्हाला ही सेवा वापरायची असेल तर तुम्हाला नंबर पोर्ट करावा लागेल.
5G फोन खरेदी करण्यापूर्वी काय लक्षात ठेवावे
5G स्मार्टफोनवर जास्त खर्च करण्यापूर्वी, तुमची नेटवर्क प्रोव्हायडर कंपनी 5G नेटवर्क पुरवते की नाही याची खात्री करून घेतली पाहिजे. कारण नाही तर तो फक्त अतिरिक्त खर्च असेल. सध्या अनेक नेटवर्क प्रोवायडर कंपन्या त्यांचे 5G नेटवर्क आणत आहेत. म्हणूनच 5G फोन खरेदी करण्यापूर्वी या गोष्टीची देखील काळजी घेतली पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: High speed internet