Home /News /technology /

उबरची नवीन सुविधा; आता व्हॉट्सअ‍ॅपवरही बुक करता येणार कॅब, ऑटो आणि बाइक राइड

उबरची नवीन सुविधा; आता व्हॉट्सअ‍ॅपवरही बुक करता येणार कॅब, ऑटो आणि बाइक राइड

उबरची ही नवीन कॅब बुकिंग सेवा या आठवड्यात सुरू होणार आहे. सुरुवातीला ही सेवा फक्त दिल्ली एनसीआर भागात उपलब्ध असेल.

मुंबई, 04 ऑगस्ट: व्हॉट्सअ‍ॅप  हा देशात सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. उबरने आता व्हॉट्सअ‍ॅप सुविधा सुरू केली आहे. आता प्रवाशांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारेदेखील कॅब बुक करता येईल, अशी घोषणा उबरने केली आहे. उबरची ही नवीन कॅब बुकिंग सेवा या आठवड्यात सुरू होणार आहे. सुरुवातीला ही सेवा फक्त दिल्ली एनसीआर  भागात उपलब्ध असेल. त्यानंतर अन्य भागांमध्ये या सुविधेचा विस्तार होईल. डिसेंबर 2021 मध्ये लखनौमध्ये सर्वप्रथम या सुविधेची चाचणी घेण्यात आली होती. ही नवीन सुविधा युझर्सना गरजेनुसार उबर अ‍ॅपला पूर्णतः बायपास करण्याची अनुमती देईल. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये सुविधा उपलब्ध या नवीन सुविधेच्या माध्यमातून कंपनीनं दिल्ली एनसीआरमधल्या ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपवर अधिकृत चॅटबॉटद्वारे उबर राइड बुक करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. व्हॉट्सअ‍ॅप इंटरफेसमध्ये नोंदणी, राइड्सचं बुकिंग आणि प्रवासाच्या पावत्या प्राप्त करण्यापर्यंच्या सर्व सुविधा दिल्या जातील. उबरची ही सेवा इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल. बुकिंगसाठी अशा आहेत तीन स्टेप्स
  • संबंधित प्रवाशाने सर्वप्रथम +917292000002 या क्रमांकावर Hi असा मेसेज पाठवावा.
  • त्यानंतर प्रवाशाला पिकअप (Pick up) आणि ड्रॉप (Drop) ऑफ लोकेशन नमूद करण्यास सांगितलं जाईल.
  • प्रवाशाला प्रवासाचा भाडे तपशील आणि ड्रायव्हर येण्याची वेळ सांगितली जाईल.
उबरची सर्व फीचर्स `प्रवाशांना उबर अ‍ॅपद्वारे थेट ट्रिप बुक करताना जी सुरक्षा फीचर्स (Safety Features) आणि विमा संरक्षण मिळतं, त्या सर्वांचा अ‍ॅक्सेस या सुविधेतही दिला जाईल,` असं कंपनीने म्हटलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर बुकिंग केल्यानंतर ड्रायव्हरचं नाव आणि ड्रायव्हरच्या लायसन्सचा क्रमांक याविषयीची माहिती संबंधित प्रवाशाला दिली जाईल. तसंच प्रवाशाला पिकअप पॉइंटच्या मार्गावरचं ड्रायव्हरचं लोकेशनही ट्रॅक करता येईल. तसंच ते ड्रायव्हरला फोन करून माहिती घेऊ शकतील; पण हा फोन क्रमांक ड्रायव्हरला दिसू शकणार नाही, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. सुरक्षेचं फीचर व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रवाशाला सुरक्षेविषयी मार्गदर्शक तत्त्वांची माहिती देईल. आणीबाणीच्या परिस्थितीत उबरपर्यंत कसं पोहोचायचं (टाइप हेल्प ऑन-ट्रिप) हेदेखील स्पष्ट करण्यात येईल. प्रवाशाने प्रवासादरम्यान आणीबाणी (Emergency) हा पर्याय निवडला तर त्यांना उबरच्या ग्राहक मदत पथकाकडून एक इनबाउंड कॉल येईल. ट्रिप संपल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत, उबर प्रवासी गरज पडल्यास सुरक्षा लाइन क्रमांकावरून कॉल करू शकतील. `ही नवीन सुविधा नव्या आणि ज्यांनी उबरवर फोन क्रमांकासह रजिस्ट्रेशन केलं आहे, अशा जुन्या युझर्ससाठी उपलब्ध आहे. या सुविधेचं आगामी नवीन व्हर्जन उबर अ‍ॅपचा सध्या वापर करत असलेल्या युझर्सना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ट्रिप बुक करण्याची परवानगी देईल,` असं कंपनीनं सांगितलं आहे.
First published:

Tags: Technology, Whats app news

पुढील बातम्या