मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /नवा फोन घ्यायचाय? चार्जिंग दोन दिवस टिकणारा Motorola चा नवा स्मार्टफोन येतोय!

नवा फोन घ्यायचाय? चार्जिंग दोन दिवस टिकणारा Motorola चा नवा स्मार्टफोन येतोय!

Motorola च्या Moto G Stylus या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 6.58 इंचाचा फुल एचडी+ LCD डिस्प्ले आहे. डिस्प्लेच्या चारही बाजूला स्लिम बेजेल्स आहेत. हा स्मार्टफोन Metallic Rose आणि Twilight Blue रंगांत उपलब्ध आहे.

Motorola च्या Moto G Stylus या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 6.58 इंचाचा फुल एचडी+ LCD डिस्प्ले आहे. डिस्प्लेच्या चारही बाजूला स्लिम बेजेल्स आहेत. हा स्मार्टफोन Metallic Rose आणि Twilight Blue रंगांत उपलब्ध आहे.

Motorola च्या Moto G Stylus या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 6.58 इंचाचा फुल एचडी+ LCD डिस्प्ले आहे. डिस्प्लेच्या चारही बाजूला स्लिम बेजेल्स आहेत. हा स्मार्टफोन Metallic Rose आणि Twilight Blue रंगांत उपलब्ध आहे.

    मुंबई, 24 फेब्रुवारी : सध्या एकापेक्षा एक नवीन स्मार्टफोन लाँच होत आहेत. वेगवेगळ्या प्राइस रेंजमध्ये येणाऱ्या या स्मार्टफोन्समध्ये अनेक जबरदस्त फीचर्स पाहायला मिळतात. मोटोरोला (Motorola) कंपनीने आतापर्यंत भारतात अनेक स्मार्टफोन्स लाँच केले आहेत; पण आता ही कंपनी एक जबरदस्त फोन घेऊन आली आहे. Moto G Stylus हा नवा स्मार्टफोन कंपनीने अमेरिकेत लाँच केला आहे. हा फोन भारतात कधी लाँच होणार, यासंदर्भात अद्याप माहिती उपलब्ध नाही. Moto G Stylus या स्मार्टफोनची किंमत जवळपास 22,400 रुपये आहे. हा फोन यूएसमध्ये कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि Amazon द्वारे खरेदी केला जाऊ शकतो.

    मोटोरोलाच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स आहेत. यात 6GB रॅमसह 128GB इंटर्नल स्टोरेज आहे. सध्या हा फोन एकाच व्हॅरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Moto G Stylus स्मार्टफोन Stylus Pen सोबत येतो. यामुळे युझर्स फोन अनलॉक न करता नोट्स करू शकतात. stylus pen चा वापर करून स्क्रीनशॉट घेता येतो आणि तो एडिटही करता येतो.

    Motorola च्या Moto G Stylus या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 6.58 इंचाचा फुल एचडी+ LCD डिस्प्ले आहे. डिस्प्लेच्या चारही बाजूला स्लिम बेजेल्स आहेत. हा स्मार्टफोन Metallic Rose आणि Twilight Blue रंगांत उपलब्ध आहे. Moto G Stylus स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ओएस वर चालणारा आहे. सुरक्षेसाठी साइड माउंटेड साइड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहेत.

    या फोनमध्ये ओव्हल आकाराचा कॅमेरा असून, त्यात तीन सेन्सर्स देण्यात आले आहेत. यात f/1.9 लेन्ससोबत 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सल लेन्स असलेला अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सेलची लेन्स दिली आहे. यासोबतच सेल्फी कॅमेरासाठी फ्रंट डिस्प्लेमध्ये पंच होल कटआउट देण्यात आला आहे.

    Moto G Stylus स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली असून, 10W चा चार्जिंग सपोर्ट दिला आहे. पूर्ण चार्ज केल्यानंतर हा फोन दोन दिवस काम करू शकतो. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4जी एलटीई, वायफाय 802.11 एसी, ब्लूटूथ व्ही5.0, जीपीएस, यूएसबी Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक अशी फीचर्स देण्यात आली आहेत. या फोनमधली फीचर्स खूप कमी स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहेत. परवडणाऱ्या किमतींमध्ये तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल.

    First published:

    Tags: Smart phone, Tech news