मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

ऐकावं ते नवलच! डास, माशांना पळवण्यासाठीही मोबाईल अ‍ॅप; धूर आणि उग्र वासापासून होईल सुटका

ऐकावं ते नवलच! डास, माशांना पळवण्यासाठीही मोबाईल अ‍ॅप; धूर आणि उग्र वासापासून होईल सुटका

डासांना पळवण्यासाठी अ‍ॅप्स फ्रीक्वेंसी साउंड निर्माण करतात. या आवाजानेच डास पळून जातात. हा आवाज इतका कमी असतो की व्यक्तीला तो ऐकू जात नाही (Mosquito Killer Apps)

डासांना पळवण्यासाठी अ‍ॅप्स फ्रीक्वेंसी साउंड निर्माण करतात. या आवाजानेच डास पळून जातात. हा आवाज इतका कमी असतो की व्यक्तीला तो ऐकू जात नाही (Mosquito Killer Apps)

डासांना पळवण्यासाठी अ‍ॅप्स फ्रीक्वेंसी साउंड निर्माण करतात. या आवाजानेच डास पळून जातात. हा आवाज इतका कमी असतो की व्यक्तीला तो ऐकू जात नाही (Mosquito Killer Apps)

मुंबई 09 ऑगस्ट : पावसाळ्यात डास आणि माशांचा त्रास असह्य होत असतो. डासांमुळे तर डेंग्यू, मलेरियासारखे आजारही होतात. त्यावर उपाय म्हणून इलेक्ट्रिक मॉस्किटो किलर बॅट (Mosquito Killer Racket), मॉस्किटो रिपेलंट (Mosquito Repellant), मच्छरदाणी, मच्छर अगरबत्ती असे असंख्य पर्याय तुम्ही निवडत असता. पण तरीही त्यापासून सुटका मिळत नाही. पण आता मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करून डास, माशांपासून मुक्ती मिळवता येईल. उग्र वास, धूर याचा त्रास सहन न करता डासांचा बंदोबस्त लावण्यासाठी विविध अ‍ॅपचा पर्याय सर्वांसाठी उपलब्ध आहे. ‘झी न्यूज हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. डास पळवण्यासाठी कसं काम करतात अ‍ॅप्स डासांना पळवण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर मॉस्किटो किलर, मॉस्किटो साउंड, फ्रीक्वेन्सी जनरेटर अशी अनेक अ‍ॅप्स आहेत. या अ‍ॅप्सना लाखांहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे. डासांना पळवण्यासाठी अ‍ॅप्स फ्रीक्वेंसी साउंड निर्माण करतात. या आवाजानेच डास पळून जातात. हा आवाज इतका कमी असतो की व्यक्तीला तो ऐकू जात नाही. पण डासांपर्यंत तो आवाज जाऊन त्यांना पळवण्यासाठी त्याचा उपयोग होतो, असा दावा डेव्हलपर्सकडून करण्यात आलाय. ऐकावं ते नवलंच! स्पर्म, अंडाशय, गर्भाशयाशिवाय कृत्रिम भ्रूण विकसित, कशी साधली किमया? किती परिणामकारक आहेत ही अ‍ॅप? डास पळवण्याचा दावा करणारी अ‍ॅप बरीच उपयोगी आहेत, असा दावा डेव्हलपर्स करत असले तरी त्यांना खूप कमी रेटिंग (Rating) मिळाली आहेत. डाउनलोड करणाऱ्या व्यक्तींनी काही अ‍ॅप्सना 5 पैकी 2 तर काहींना 3 रेटिंग दिलं आहे. त्यांच्या मते, डास पळवण्यासाठी अ‍ॅप कमी परिणामकारक आहेत. अ‍ॅप ऑन केल्यानंतरही डासांचा त्रास काही कमी होत नाही. परंतु, अ‍ॅप डाउनलोड करून पाहता येतील. कदाचित तुमचा अनुभव वेगळा काही असू शकेल. या अ‍ॅपवर जाहिरातींची संख्याही खूप आहे. याला इन्स्टॉल केल्यानंतर अनेक जाहिराती यावर पाहायला मिळतात. मोबाईल व नवनवीन तंत्रज्ञानामुळे कुठलीही गोष्ट अशक्य अशी राहिलेली नाही. अभ्यास, मनोरंजनासह प्रत्येक बाब मोबाईलच्या माध्यमातून साध्य करता येऊ शकते. डास पळवण्यासाठीही कुठलं गॅझेट काम करू शकेल याची साधी कल्पनाही आपण केली नसेल; पण वास्तवात काही अ‍ॅप्स आल्याने डास, माशांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा एक पर्याय असू शकतो. त्यामुळे अशा प्रकारची अ‍ॅप्स एकदा तरी मोबाईलमध्ये डाउनलोड करून पाहायला हवीत, असं अनेकांना वाटू शकतं.
First published:

Tags: Apps, Mobile app

पुढील बातम्या