मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /ऐकावं ते नवलंच! स्पर्म, अंडाशय, गर्भाशयाशिवाय कृत्रिम भ्रूण विकसित, कशी साधली किमया?

ऐकावं ते नवलंच! स्पर्म, अंडाशय, गर्भाशयाशिवाय कृत्रिम भ्रूण विकसित, कशी साधली किमया?

तंत्रज्ञानात इस्रायलचे नाव आघाडीवर आहे. अनेक बाबतीत इस्रायलचे तंत्रज्ञान अमेरिकेसारख्या देशांपेक्षा खूप पुढे असल्याचे बोलले जाते. आता इस्रायलनेही शास्त्रोक्त पद्धतीने भ्रूण बनवले आहेत.

तंत्रज्ञानात इस्रायलचे नाव आघाडीवर आहे. अनेक बाबतीत इस्रायलचे तंत्रज्ञान अमेरिकेसारख्या देशांपेक्षा खूप पुढे असल्याचे बोलले जाते. आता इस्रायलनेही शास्त्रोक्त पद्धतीने भ्रूण बनवले आहेत.

तंत्रज्ञानात इस्रायलचे नाव आघाडीवर आहे. अनेक बाबतीत इस्रायलचे तंत्रज्ञान अमेरिकेसारख्या देशांपेक्षा खूप पुढे असल्याचे बोलले जाते. आता इस्रायलनेही शास्त्रोक्त पद्धतीने भ्रूण बनवले आहेत.

  नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : कोणत्याही प्रकारचा जीव जन्माला येण्यासाठी स्पर्म (Sperm) आणि गर्भाशय (Uterus) गरजेचं असतं. याशिवाय जीवनिर्मिती होऊ शकत नाही; पण प्रगत कृषी तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या इस्रायलनं (Israel) आता वैद्यकीय क्षेत्रात (Medical Sector) एक अनोखं संशोधन करून जगभराचं लक्ष वेधलं आहे. इस्रायलने स्पर्मशिवाय जगातला पहिला कृत्रिम भ्रूण (Artificial Embryo) तयार केला आहे. हा भ्रूण उंदराचा (Rat) आहे. सध्या या भ्रूणाच्या हृदयाचे ठोके पडू लागले असून, मेंदूही विकसित होऊ लागला आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने या संशोधनाविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  इस्रायल हा देश प्रगत कृषी तंत्रज्ञान आणि पॅलेस्टाइनसोबत सातत्याने सुरू असलेल्या संघर्षामुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या इस्रायलने गाझा पट्टीतल्या अनेक भागांना आपलं लक्ष्य बनवलं आहे. एकीकडे या सर्व गोष्टींची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एका अनोख्या अविष्कारामुळे इस्रायल चर्चेत आला आहे. कोणताही जीव जन्माला येण्यासाठी स्पर्म, अंडाशय आणि गर्भाशयाची आवश्यकता असते; पण इस्रायलने या तीनही गोष्टींचा वापर न करता एक कृत्रिम भ्रूण निर्माण केला आहे. या संशोधनाचे आतापर्यंतचे निष्कर्ष सकारात्मक आहेत. हा भ्रूण तयार करण्यासाठी इस्रायलमधल्या संशोधकांनी विशेष तंत्राचा अवलंब केला आहे.

  इस्रायलमधल्या वेझमन इन्स्टिट्यूटने (Weizmann Institute) स्टेम सेल्सच्या (Stem Cells) मदतीनं कृत्रिम भ्रूण तयार केला आहे. स्टेम सेलपासून तयार केलेला हा भ्रूण एका खास ठिकाणी ठेवण्यात आला होता. तिथंच तो विकसित केला गेला. गर्भाशिवाय केवळ स्टेम सेलच्या मदतीनं एक जीव निर्माण केला जातोय हीच मोठी गोष्ट आहे. गर्भात भ्रूण विकासासाठी ज्या पद्धती आवश्यक असतात, त्या सर्व पद्धतींचा अवलंब संशोधकांनी केला. यामध्ये नैसर्गिक पद्धतींव्यतिरिक्त इतर कृत्रिम पद्धतींचा वापर केला गेला असून, तेच वातावरण कृत्रिम पद्धतीनेही देण्यात आले. या प्रकारचा प्रयत्न यापूर्वीही करण्यात आला होता. परंतु, अनेकदा सेल्स तयार करणं कठीण बनलं होतं. कारण प्रत्यारोपणासाठी विशिष्ट ऊती उपलब्ध होत नव्हत्या.

  खूपच रंजक आहे ‘आंतरराष्ट्रीय मांजर दिना’चा इतिहास, जाणून व्हाल चकित

  इस्रायलमधल्या वेझमन इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी या प्रकारे भ्रूण तयार करता येऊ शकतो का याचा अंदाज घेतला आणि त्यात ते यशस्वीदेखील झाले. सध्या या भ्रूणाच्या हृदयाचे ठोके (Heart Beats) पडू लागले आहेत. मेंदूही विकसित होत आहे. हा भ्रूण उंदराचा आहे. त्यात शेपटीसह अन्य अवयवांचा विकास सुरू झाला आहे. हा एक प्रकारचा कृत्रिम भ्रूण आहे. कारण तो फलित अंड्याशिवाय तयार केलेला आहे. यामुळे भ्रूणापासून शरीराची निर्मिती कशी होते, हे जाणून घेण्यास मदत होणार आहे. `जनावरांमध्ये असे प्रयोग कमी होऊ शकतात; मात्र मानवी अवयव प्रत्यारोपणासाठी अशा प्रयोगाची मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, ल्युकेमियाच्या रुग्णाच्या त्वचेच्या पेशीवर उपचार करण्यासाठी अस्थिमज्जा अर्थात बोन मॅरो पेशींमध्ये रूपांतर करणं यामुळे शक्य आहे,` असं संशोधक सांगतात. `हे संशोधन पुढील अनेक संशोधनांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. तसंच या संशोधनाच्या आधारे अनेक प्रकारचे भ्रूण तयार करण्यास मदत होईल,` असं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे.

  First published:

  Tags: Israel