मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

झक्कास! ‘मेड इन इंडिया’ स्मार्टवॉच झालं लाँच, वाचा किंमत आणि फीचर्स

झक्कास! ‘मेड इन इंडिया’ स्मार्टवॉच झालं लाँच, वाचा किंमत आणि फीचर्स

वेअरेबल ब्रँड Mivi ने भारतीय मार्केटमध्ये ग्राहकांसाठी परवडणारं स्वस्त घड्याळ लाँच केलं आहे. Mivi Model E Smartwatch कंपनीच्या अधिकृत साइट व्यतिरिक्त, ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.

वेअरेबल ब्रँड Mivi ने भारतीय मार्केटमध्ये ग्राहकांसाठी परवडणारं स्वस्त घड्याळ लाँच केलं आहे. Mivi Model E Smartwatch कंपनीच्या अधिकृत साइट व्यतिरिक्त, ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.

वेअरेबल ब्रँड Mivi ने भारतीय मार्केटमध्ये ग्राहकांसाठी परवडणारं स्वस्त घड्याळ लाँच केलं आहे. Mivi Model E Smartwatch कंपनीच्या अधिकृत साइट व्यतिरिक्त, ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 2 डिसेंबर: अगदी स्वस्तात स्मार्टवॉच खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. नुकतीच सर्वांत स्वस्त ‘मेड इन इंडिया’ स्मार्टवॉच लाँच करण्यात आली आहेत. वेअरेबल ब्रँड Mivi ने भारतीय मार्केटमध्ये ग्राहकांसाठी परवडणारं स्वस्त घड्याळ लाँच केलं आहे. Mivi Model E Smartwatch कंपनीच्या अधिकृत साइट व्यतिरिक्त, ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.

कंपनीने ही लेटेस्ट वॉच 6 वेगवेगळ्या शेड्ससह लाँच केली आहेत. या Mivi मॉडेल E मध्ये HD टचस्क्रीन देण्यात आली आहे, तसंच या वॉचला वॉटर आणि स्वेट रेझिस्टन्ससाठी IP68 रेटिंग मिळालं आहे. या Mivi स्‍मार्टवॉचची भारतातील किंमत आणि या वॉचमध्‍ये दिलेल्‍या सर्व फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

स्मार्टवॉचची किंमत-

Mivi ब्रँडच्या या परवडणाऱ्या स्मार्टवॉचची किंमत 1,299 रुपये ठेवण्यात आली आहे. ही स्मार्टवॉच तुम्ही Mivi च्या अधिकृत साइट आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकाल. ही स्मार्टवॉच ब्लू, पिंक, ग्रे, रेड, ब्लॅक आणि ग्रीन रंगात उपलब्ध आहे. लोक त्यांच्या आवडीच्या रंगाची स्मार्टवॉच खरेदी करू शकतात.

स्मार्टवॉचची फीचर्स-

या मेड इन इंडिया स्मार्टवॉचमध्ये कंपनीने 500 nits ब्राईटनेससह 1.69-इंचाचा HD कटिंग-एज डिस्प्ले दिला आहे. याशिवाय, तुम्हाला या वॉचमध्ये 200 mAh बॅटरी मिळेल, जी मॅग्नेटिक चार्जिंगसह स्मार्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

हेही वाचा: सावधान! तुमचं प्रायव्हेट चॅट कुणी वाचत नाही ना? 2 मिनिटांत करा चेक

कंपनीने बॅटरीबद्दल एक महत्त्वाचा दावा केला आहे. त्यानुसार ही लेटेस्ट आणि स्वस्त स्मार्टवॉच एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर सामान्य वापरासाठी 7 दिवस चालतील. यामुळे ग्राहकांना 20 दिवसांचा स्टँडबाय टाईम मिळेल. 1299 रुपयांच्या या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला 50 पेक्षा जास्त क्लाउड वॉच फेस मिळतील जी तुम्ही Mivi अ‍ॅपद्वारे कस्टमाइझ करू शकता.कनेक्टिव्हिटीसाठी ही स्मार्टवॉच ब्लूटूथ व्हर्जन 5.1 ला सपोर्ट करतात. या वॉचमध्ये तुम्हाला अनेक हेल्थ फीचर्स पाहायला मिळतील. स्लिप मॉनिटरिंग, ब्लड प्रेशर, स्टेप काउंट ट्रॅकिंग, ब्लड ऑक्सिजन लेव्हल इत्यादी गोष्टींचा ट्रॅक ही स्मार्टवॉच ठेवते.हे सर्व फीचर्स मिव्ही हेल्थ अ‍ॅपद्वारे अ‍ॅक्सेस करता येतात.

ही स्मार्टवॉच अँड्रॉइड आणि अ‍ॅपल आयफोन या दोन्ही मॉडेल्सशी कम्पॅटिबल आहे. यामध्ये आणखी काही महत्त्वाची फीचर्सदेखील देण्यात आली आहेत. ज्यामध्ये म्युझिक कंट्रोल, अलार्म क्लॉक आणि वेदर अपडेट्स यांचा समावेश आहे. कंपनीने ही स्मार्टवॉच 120 हून अधिक स्पोर्ट्स मोडसह लाँच केली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही स्मार्टवॉच ग्राहकांना 28 वेगवेगळ्या भाषा ऑफर करतं.

First published:

Tags: Smartwatch