मुंबई, 21 मे : जगातील बलाढ्य टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने (Microsoft) Internet Explorer ही वेब ब्राऊजर सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या ब्लॉगमधून ही माहिती देण्यात आली आहे. विंडोज 95 (Windows 95) सोबत या वेब ब्राऊजरची सेवा सुरु करण्यात आली होती. गेली 25 वर्ष ही सेवा सुरु होती. गेल्या काही वर्षांपासून मायक्रोसॉफ्टने Windows युझर्सना Internet Explorer वरुन Edge Browser वर शिफ्ट होण्यासाठी वेळ दिला होता. आता Internet Explorer 15 जून 2022 पासून रिटायर होत असल्याची अधिकृत घोषणा कंपनीनं केली आहे.
The future of Internet Explorer on Windows 10 is in Microsoft Edge—the Internet Explorer 11 desktop application will be retired on June 15, 2022 https://t.co/o1vj2Hxksb pic.twitter.com/22ReVYyw3G
— Windows Blogs (@windowsblog) May 19, 2021
गेली 25 वर्ष युझर्सना सेवा देणारे Internet Explorer हे ब्राऊझर पुढच्या वर्षी 15 जून रोजी निवृत्त होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मायक्रोसॉफ्ट एज चे प्रबंधक सीन लिंडर्से यांनी या विषयावर दिलेल्या माहितीनुसार इंटरनेट एक्सप्लोरर डेस्कटॉप 11आणि विंडोज 10 च्या काही प्रकारमधून 15 जून 2022 पासून बंद होईल. Facebook वर कोणी तुम्हाला ट्रॅक करतंय का? या Settings ठरतील फायदेशीर ‘विंडोज 10 वर इंटरनेट एक्सप्लोररचे भविष्य मायक्रोसॉफ्ट एज आहे. मायक्रोसॉफ्ट एज हे इंटरनेट एक्सप्लोररच्या तुलनेमध्ये अधिक वेगवान, अधिक सुरक्षित आणि अधिक आधुनिक आहे. त्याचबरोबर जुन्या आणि पांरंपारिक वेबसाईट तसेच अॅप्लिकेशनसाठी ते योग्य आहे,’ असा दावा लिंडर्से यांनी केला आहे.

)







