मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /लाँच होण्यापूर्वीच मायक्रोसॉफ्टची मोठी माहिती लीक; युझर इंटरफेस आणि स्टार्ट मेनूमध्ये बदल

लाँच होण्यापूर्वीच मायक्रोसॉफ्टची मोठी माहिती लीक; युझर इंटरफेस आणि स्टार्ट मेनूमध्ये बदल

मायक्रोसॉफ्ट (Microsoft) ही तंत्रज्ञान क्षेत्रातली दिग्गज कंपनी पर्सनल कम्प्युटर (Personal Computer) युझर्ससाठीच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये (Operating System) लवकरच मोठा बदल करणार आहे.

मायक्रोसॉफ्ट (Microsoft) ही तंत्रज्ञान क्षेत्रातली दिग्गज कंपनी पर्सनल कम्प्युटर (Personal Computer) युझर्ससाठीच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये (Operating System) लवकरच मोठा बदल करणार आहे.

मायक्रोसॉफ्ट (Microsoft) ही तंत्रज्ञान क्षेत्रातली दिग्गज कंपनी पर्सनल कम्प्युटर (Personal Computer) युझर्ससाठीच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये (Operating System) लवकरच मोठा बदल करणार आहे.

नवी दिल्ली, 17 जून: मायक्रोसॉफ्ट (Microsoft) ही तंत्रज्ञान क्षेत्रातली दिग्गज कंपनी पर्सनल कम्प्युटर (Personal Computer) युझर्ससाठीच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये (Operating System) लवकरच मोठा बदल करणार आहे. 24 जून रोजी विंडोज 11 सादर केलं जाण्याची शक्यता आहे; मात्र मायक्रोसॉफ्टच्या या इव्हेंटच्या आधीच विंडोज 11च्या (Windows 11) बाबतीतली माहिती लीक झाली आहे. बैडू (Baidu) या चीनच्या वेबसाइटवर विंडोज 11चे काही स्क्रीनशॉट्स सापडले आहेत.

त्या स्क्रीनशॉट्सनुसार, विंडोजची ही नवी व्हर्जन नव्या इंटरफेससह (User Interface) सादर होणार आहे. त्यात नवा स्टार्ट मेनू, राउंडेड कॉर्नर्स असे बदल करण्यात आलेले आहेत. तसंच, नव्या अपडेट्ससह विंडोजचा नवा लोगोही (New Logo) सादर केला जाणार आहे. XDA Developersच्या म्हणण्यानुसार, हा ब्लू मायक्रोसॉफ्ट लोगो आहे. लीक झालेल्या इमेजमध्ये युझर इंटरफेस सन व्हॅली डिझाइन थीमवर आधारित असल्याचं दिसत आहे.

नव्या विंडोजमध्ये सगळ्यात मोठा बदल टास्कबारमध्ये (Taskbar) असू शकतो. आता टास्कबार मध्यभागी देण्यात आला असून, त्यात नवं स्टार्ट बटण आणि मेनू आहे. स्टार्ट मेनूमध्ये लाइव्ह टाइल्सचा (Live Tiles) समावेश नाही. तसंच, त्यात पिन्ड अॅप्स, रिसेंट फाइल्स आणि विंडोज 11 डिव्हाइसेससाठी क्विक शट डाउन/रिस्टार्टचं बटण देण्यात आलं आहे.

हेही वाचा- काळजी घ्या! महाराष्ट्रात वाढतायेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे कोरोना रुग्ण

अॅप आयकॉन्स (App Icons) आणि स्टार्ट मेनू उजवीकडे घेऊन जाण्यासाठीचा एक पर्यायही आहे. विंडोज 11देखील डार्क मोडसह (Dark Mode) सादर होईल, अशी अपेक्षा आहे. तसंच, आणखी एक बदल म्हणजे राउंडेड कॉर्नर्सच्या (Rounded Corners) वापराचा आहे. स्टार्ट मेनू, फाइल एक्स्प्लोअरर, कॉन्टॅक्ट मेनू असे युझर इंटरफेसचे प्रमुख एलिमेंट्स राउंडेड कॉर्नर्ससह देण्यात आले आहेत.

XDA Developersच्या म्हणण्यानुसार, विंडोजच्या सर्चमध्ये मोठा बदल झाला आहे. युझर्स आता अॅप्स, डॉक्युमेंट्स, सेंटिग्ज यानुसार फिल्टर करू शकतात. विंडोज 11मध्ये नवे स्नॅप कंट्रोल देण्यात आले आहेत. ते मॅक्सिमाइज बटणाच्या साह्याने अॅक्सेस केले जाऊ शकतात.

हेही वाचा- WTC Final : टीम इंडियाच्या Playing XI बद्दल सचिनचा सल्ला, म्हणाला...

जगातल्या जवळपास 75 टक्के कम्प्युटर्समध्ये विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते. विंडोज 10नंतर बऱ्याच कालावधीनंतर आता विंडोज 11 हा अपडेट आला आहे. त्यामुळे सर्व युझर्सचं त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

First published:

Tags: Microsoft