मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आता सगळे व्यवहार होणार ‘नखावर’, नाही गरज debit- credit कार्डची

आता सगळे व्यवहार होणार ‘नखावर’, नाही गरज debit- credit कार्डची

हाताच्या बोटावरील नखात मायक्रो चिप (Micro Chip in the nail) बसवून त्याआधारे डिजिटल पेमेंट (Digital Payment) करण्याच्या सुविधेचा नुकताच शोध लागला आहे.

हाताच्या बोटावरील नखात मायक्रो चिप (Micro Chip in the nail) बसवून त्याआधारे डिजिटल पेमेंट (Digital Payment) करण्याच्या सुविधेचा नुकताच शोध लागला आहे.

हाताच्या बोटावरील नखात मायक्रो चिप (Micro Chip in the nail) बसवून त्याआधारे डिजिटल पेमेंट (Digital Payment) करण्याच्या सुविधेचा नुकताच शोध लागला आहे.

नवी दिल्ली, 16 जुलै: विज्ञान (Science) दिवसेंदिवस नवनवे चमत्कार करत असतं आणि कल्पनेच्याही पलिकडील शोध लावत असतं. हाताच्या बोटावरील नखात मायक्रो चिप (Micro Chip in the nail) बसवून त्याआधारे डिजिटल पेमेंट (Digital Payment) करण्याच्या सुविधेचा नुकताच शोध लागला आहे. ही यंत्रणा सध्या दुबईत (Dubai) कार्यान्वित करण्यात आली असून अनेक नागरिक या सुविधेचा वापर करत आहेत.

कार्ड विसरलात तरी बेहत्तर

या नव्या तंत्रज्ञानाचं नाव आहे मायक्रोचिप मिनिक्योअर. दुबईत या तंत्रज्ञानाचा जोरदार वापर आता सुरू झाला आहे. या तंत्रज्ञानानुसार ग्राहकांच्या नखावर एक मायक्रो चिप लावण्यात येते. ही चिप ग्राहकांना हव्या असणाऱ्या डेबिट आणि क्रेडिट कार्डशी सिंक केलं जातं. त्यानंतर प्रत्यक्ष क्रेडीट किंवा डेबिट कार्ड जवळ न बाळगताही ग्राहकांना शॉपिंग करणं शक्य होतं.

ना ऑपरेशन, ना दुखापत

आता नखात चिप बसवून घ्यायची म्हणजे काहीतरी वेदनादायक प्रकार असणार, असं तुम्हाला वाटेल. मात्र ही चिप बसवताना कुठलीही वेदना होत नाही. यासाठी कुठलंही ऑपरेशन किंवा सर्जरी करावी लागत नाही. साधं इंजेक्शनदेखील घेण्याची गरज नसते. ही चिप ग्राहकांच्या नखावर हळूवार ठेवली जाते आणि त्यानंतर एका खास प्रकारच्या यंत्राद्वारे ती नखात प्रेस करण्यात येते. त्यामुळे नखाचा काही भाग आपोआप कापला जाऊन त्याच्या वरच्या थरात ही चिप घट्ट बसते. एकदा ही चिप नखांत बसवली की मग त्याचं स्कॅनिंग करण्यात येतं आणि मोबाईलचा वापर करून हव्या त्या प्रकारच्या सेटिंग त्यात करण्यात येतात.

हे वाचा -Twitter ची मोठी घोषणा! वादाच्या पार्श्वभूमीवर बंद हे फीचर करणार बंद

असं आहे तंत्र

ही यंत्रणा सध्या Lanour Beauty Launge या कंपनीकडून पुरवण्यात येतं. हे एक वायरलेस तंत्र असून लवकरच याचा जगभर प्रसार होईल, असा विश्वास कंपनीचे सीईओंनी व्यक्त केला आहे. सध्या तरी हे तंत्र वापरण्यासाठी तुम्हाला दुबईला जावं लागेल. मात्र काही काळात हे तंत्र सर्व देशांत उपलब्ध होईल, असा अंदाज आहे.

First published:

Tags: Credit card, Shopping debit card, Technology