मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Whatsapp Windows Native App: फोन बंद असतानाही करता येणार मेसेज, व्हॉट्सअ‍ॅपचं अप्रतिम फीचर लाँच

Whatsapp Windows Native App: फोन बंद असतानाही करता येणार मेसेज, व्हॉट्सअ‍ॅपचं अप्रतिम फीचर लाँच

Whatsapp Windows Native App: फोन बंद असतानाही करता येणार मेसेज, व्हॉट्सअ‍ॅपचं अप्रतिम फीचर लाँच

Whatsapp Windows Native App: फोन बंद असतानाही करता येणार मेसेज, व्हॉट्सअ‍ॅपचं अप्रतिम फीचर लाँच

WhatsApp Windows Native App: व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्सना सतत नवनवीन फिचर्स देत असतं. WhatsApp ने बुधवारी आपलं नवीन व्हॉट्सअ‍ॅप विंडोज अ‍ॅप लाँच केलं आहे.

  मुंबई, 17 ऑगस्ट:  आजकाल सोशल मीडिया (Social Media) हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आपणं सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत सोशल मीडिया वापरत असतो. त्यातही अनेकजण सकाळी उठल्याबरोबर फोनमध्ये सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप उघडतात. अलीकडे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर फक्त मित्रमैत्रीणींसोबत गप्पा मारण्यासाठी होत नाही, अनेक ऑफिसच्या महत्त्वाच्या चर्चाही व्हॉट्सअ‍ॅपवर होतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप ‘व्हॉट्सअ‍ॅप ’ आपल्या यूजर्सना सतत नवनवीन फिचर्स देत असतं. WhatsApp ने बुधवारी आपलं नवीन व्हॉट्सअ‍ॅप विंडोज अ‍ॅप (WhatsApp Windows Native App) लाँच केलं आहे. आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप फक्त व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या मदतीने लॅपटॉपमध्ये वापरता येत होतं. परंतु या अ‍ॅपच्या मदतीनं तुम्ही आता लॅपटॉपवर अ‍ॅपपच्या मदतीनं व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकणार आहात. विंडोज नेटिव्ह अ‍ॅपची अधिकृत घोषणा करताना व्हॉट्सअ‍ॅपनं सांगितलं की, या अ‍ॅपमध्ये विश्वासार्हता आणि वेग दोन्ही वाढवलं ​​जातील. वापरकर्ते त्यांचा फोन ऑफलाइन असतानाही विंडोज आणि मॅक लॅपटॉपमध्ये WhatsApp सूचना आणि संदेश वापरू शकतील. कंपनीनं सांगितलं की, या अ‍ॅपद्वारे यूजर्सचा फोन क्यूआर कोडनं स्कॅन करून लॉग इन करता येईल. आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपचे हे विंडोज नेटिव्ह अ‍ॅप मॅकसाठी डेव्हलपमेंटच्या टप्प्यात आहे, त्याची फक्त बीटा आवृत्ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे अ‍ॅप विंडोजसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. वापरकर्ते मायक्रोसॉफ्ट अ‍ॅप स्टोअरवरून विंडोज नेटिव्ह अ‍ॅपडाउनलोड करू शकतात. हेही वाचा-  Smartphone Charger: मोबाईल अनेक चार्जर फक्त एक! आज होऊ शकतो ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
  अशा प्रकारे होईल कनेक्ट-
  Windows आणि Mac लॅपटॉपमध्ये WhatsApp नेटिव्ह अ‍ॅपवर लॉग इन करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनवर WhatsApp उघडावं लागेल, त्यानंतर आय (i) बटणावर टॅप करा आणि लिंक डिव्हाइस ऑप्शनवर जा. यानंतर येथून विंडोज आणि मॅक लॅपटॉपच्या व्हॉट्सअ‍ॅप नेटिव्ह अ‍ॅपचा क्यूआर कोड फोनवरून स्कॅन करण्याचा पर्याय येतो. एकदा स्कॅन केल्यावर तुम्ही Windows आणि Mac लॅपटॉपवर WhatsApp सूचना आणि संदेश अ‍ॅक्सेस करू शकता. यानंतर तुमचा फोन ऑफलाइन असला तरी तुम्ही लॅपटॉपमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकाल.
  Published by:Suraj Sakunde
  First published:

  Tags: Whatsapp, WhatsApp features

  पुढील बातम्या