मुंबई, 29 सप्टेंबर: मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. देशात विकली जाणारी जवळपास प्रत्येक दुसरी कार मारुतीची आहे. एकूण प्रवासी वाहन उद्योगात कंपनीचा 50 टक्के वाटा आहे. आता मारुतीनं एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी लवकरच देशात नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. दुसरीकडे, टाटा मोटर्स ही देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार विकणारी भारतीय कंपनी आहे. महिंद्रानं अलीकडेच आपली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली आहे. अशा परिस्थितीत मारुतीचा हा निर्णय टाटा आणि महिंद्रासाठी मोठे आव्हान म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे, ज्यांनी परवडणारी इलेक्ट्रिक कार घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय खूप चांगला ठरू शकतो, कारण मारुती तिच्या परवडणाऱ्या कारसाठी ओळखली जाते.
मारुती सुझुकीचे भारतात SUV नंतर इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीकडे लक्ष दिलं आहे. याचे संकेत नुकत्याच संपलेल्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये दिसून आले, जिथे कंपनीने आपली पहिली EV संकल्पना कार, eVX चे अनावरण केले. ही इलेक्ट्रिक कार येत्या एक-दोन वर्षांत बाजारात दाखल होईल. आता कंपनीच्या जपानी भागीदार सुझुकी मोटर्सने पुष्टी केली आहे की कार निर्माता भारतात सहा इलेक्ट्रिक कार लॉन्च करेल. येत्या सात वर्षांत देशाचा 40 टक्क्यांहून अधिक इलेक्ट्रिक मार्केट शेअर काबीज करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
हेही वाचा: ‘या’ 5 ई-बाईक भारतात करणार धूम! किंमतही बजेटमध्ये, पाहा लिस्ट
ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध असतील-
मारुतीने अलीकडेच आपली रणनीती उघड केली आणि सांगितलं की कंपनी भारतात आर्थिक वर्ष 2024 मध्ये ऑटो एक्सपो 2023 मध्ये लॉन्च केलेली SUV बॅटरी EV लाँच करेल. यानंतर 2030 पर्यंत आणखी 6 इलेक्ट्रिक मॉडेल्स लाँच केल्या जातील. कंपनी इलेक्ट्रिक तसेच हायब्रीड कार लाँच करणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. पुढील काही वर्षांमध्ये कंपनीकडे सुमारे 25 टक्के हायब्रिड इलेक्ट्रिक मॉडेल्स असतील, तर लाइनअपमधील एकूण इलेक्ट्रिक मॉडेल्सची संख्या 15 टक्क्यांहून अधिक असेल.
कंपनी बायोगॅस आणि इथेनॉलवर चालणाऱ्या कारही लाँच करणार –
मारुती सुझुकी केवळ इलेक्ट्रिक वाहने आणण्याचं उद्दिष्ट ठेवत नाही, तर सीएनजी, बायोगॅस आणि इथेनॉल ब्लेंड इंधनावर चालणारी अनेक मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहे. मारुतीकडे सध्या 10 पेक्षा जास्त मॉडेल्स आहेत, जी भारतात CNG सह देखील येतात. कंपनीनं ऑटो एक्सपोमध्ये फ्लेक्स इंधनावर चालणारी WagonR देखील लाँच केली आहे. मात्र, मारुतीनं बायोगॅस इंधनावर चालणारे कोणतेही मॉडेल अद्याप लाँच केलेलं नाही. सुझुकीनं सांगितले की, बायोगॅसचा वापर सुझुकीच्या सीएनजी मॉडेलला उर्जा देण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्याचा भारतातील सीएनजी कार बाजारपेठेतील सुमारे 70 टक्के वाटा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.