Home /News /technology /

2020 मध्येही Maruti Suzuki Swift ठरली भारतातील सर्वाधिक विक्री झालेली कार

2020 मध्येही Maruti Suzuki Swift ठरली भारतातील सर्वाधिक विक्री झालेली कार

गेल्या अनेक काळापासून मारुती सुझुकीच्या कार्स अनेक ग्राहकांची पहिली पसंती ठरते आहे. गेल्या 6 महिन्यांत सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप 10 पैकी 7 गाड्या मारुती सुझुकीच्या आहेत.

  नवी दिल्ली, 18 डिसेंबर : गेल्या अनेक काळापासून मारुती सुझुकीच्या कार्स अनेक ग्राहकांची पहिली पसंती ठरते आहे. आजही मारुती सुझुकी कार्सची क्रेझ कायम असून भारतातील सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली आहे. JATO डायनेमिक्सने (JATO Dynamics) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) 2020 मध्ये सर्वाधिक विक्री झालेले मॉडेल ठरलं आहे. Maruti Suzuki ने जून 2020 ते नोव्हेंबर 2020 या काळात दर महिन्याला मारुती सुझुकी स्विफ्ट मॉडेलच्या तब्बल 15, 798 वाहनांची विक्री केली आहे. गेल्या 6 महिन्यांत सर्वाधिक विक्री झालेल्या 10 पैकी 7 गाड्या मारुती सुझुकीच्या आहेत.

  (वाचा - जानेवारीपासून महागणार गाड्या,आता या गाड्यांवर मिळतो 1 लाखांपर्यंत बंपर डिस्काउंट)

  Maruti च्या 4 टॉप मॉडेलची सर्वाधिक विक्री झाली आहे. त्यापैकी पहिल्या क्रमांकावर स्विफ्ट आहे. तर सर्वाधिक विक्री झालेल्या दुसऱ्या क्रमांकावर वॅगनआर (WagonR) कार आहे. WagonR च्या सरासरी 14,466 वाहनांची महिन्याला विक्री झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर अल्टो 800 चा (Alto 800) नंबर लागतो. Alto 800 च्या 12,461 गाड्यांची विक्री झाली आहे. तर 14,316 युनिट्सच्या विक्रीसह बलेनो (Baleno) गाडी सर्वाधिक विक्री झालेल्या कार्समध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

  (वाचा - Hyundai च्या 'या' मॉडेलची बंपर विक्री; 40 दिवसांत तब्बल 30 हजार कार्सचं बुकिंग)

  सर्वाधिक विक्री झालेल्या कार्समध्ये पाचव्या क्रमांकावर हुंदाई क्रेटा (Hyundai Creta) असून Hyundai Creta च्या 11,480 गाड्यांची विक्री झाली आहे.

  (वाचा - बाईकवरून प्रवास करण्याच्या नियमात बदल; आता हे नियम पाळावेच लागणार)

  त्यानंतर Maruti Dzire 11,328 युनिट्स, Maruti Eeco, Hyundai Grand i10 NIOS, Kia Seltos and Maruti Ertiga या कारचा पहिल्या टॉप 10 सर्वाधिक विक्री झालेल्या कार्समध्ये समावेश आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Car

  पुढील बातम्या