जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Hyundai च्या 'या' मॉडेलची बंपर विक्री; 40 दिवसांत तब्बल 30 हजार कार्सचं बुकिंग

Hyundai च्या 'या' मॉडेलची बंपर विक्री; 40 दिवसांत तब्बल 30 हजार कार्सचं बुकिंग

Hyundai च्या 'या' मॉडेलची बंपर विक्री; 40 दिवसांत तब्बल 30 हजार कार्सचं बुकिंग

आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या मॉडेलचं डिझाइन ग्राहकांना आकर्षित करत आहे. हुंदाईने 5 नोव्हेंबर रोजी नवी i20 बाजारात लाँच केली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 डिसेंबर : देशातील दुसरी सर्वात मोठी कार निर्माता कंपनी हुंदाई मोटर इंडियाने (Hyundai Motor India), त्यांच्या प्रीमियम हॅचबॅक i20 (Premium Hatchback i20) लाँचिंगच्या 40 दिवसांमध्ये तब्बल 30,000 कार्सचं बुकिंग केलं आहे. या मॉडेल्सच्या 10 हजार कार्सची डिलिव्हरीही करण्यात आली आहे. हुंदाई मोटर इंडियाचे संचालक तरुण गर्ग यांनी, i20 च्या नव्या वर्जनला ग्राहकांची मोठी पसंती मिळत असल्याचं सांगितलं. आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या मॉडेलचं डिझाइन ग्राहकांना आकर्षित करत आहे. हुंदाईने 5 नोव्हेंबर रोजी नवी i20 बाजारात लाँच केली होती. भविष्यातही या कारला असाच प्रतिसाद आणि पसंती मिळेल असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे. ग्राहक सर्वाधिक नव्या i20 चे Sportz, Asta आणि Asta(O) सारखे हायएंड वेरिएंट (High-End Variants) पसंत करतात. या वेरिएंटमध्ये कंपनीने अत्याधुनिक फीचर्स दिले आहेत.

(वाचा -  वाहनांवरील Number Plate बाबत महत्त्वाची बातमी; HSRP साठी असा करावा लागेल अर्ज )

कारच्या सर्व बुकिंग्समध्ये जवळपास 85 टक्के ग्राहकांनी हेच वेरिएंट पसंत केले आहेत. या वेरिएंटमध्ये ब्लूलिंक, ऑक्सीबूस्ट एयर प्यूरिफायर, Bose चे 7 स्पीकर साउंड सिस्टम यासारखे फीचर्स दिले आहेत. याची दिल्लीतील एक्स-शोरुम किंमत 6.8 लाख रुपये ते 11.13 लाख रुपयांपर्यंत आहे.

(वाचा -  जितकी गाडी चालवाल, तितकाच प्रीमिअम भरा; ड्रायव्हिंगसाठी नवी INSURANCE POLICY )

Hyundai Premium Hatchback i20 एकूण तीन इंजिन पर्यायांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. याच्या एका वेरिएंटमध्ये 1.5 लीटर क्षमतेच्या CRDi डिझेल इंजिनचा (Diesel Engine) वापर करण्यात आला आहे. तर पेट्रोल वेरिएंटमध्ये कंपनीने 1.2 लीटर कप्पा आणि 1.0 लीटर टर्बो जीडीआय पेट्रोल इंजन (Petrol Engine) दिलं आहे. ही कार 5 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रान्समिशन (iMT) आणि 7 स्पीड डीसीटी ऑटोमेटिक गियरबॉक्ससह (AT) उपलब्ध करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: car
  • First Published :
जाहिरात
जाहिरात