Home /News /technology /

कार खरेदी न करताच घरी आणा, Maruti Suzuki ची भन्नाट योजना

कार खरेदी न करताच घरी आणा, Maruti Suzuki ची भन्नाट योजना

या योजनेत ग्राहकांना कार खरेदी करण्याची गरज नाही. मासिक भाडेतत्त्वावर ग्राहक आपली आवडती कार (Car on Monthly Rent) घरी आणू शकतात.

नवी दिल्ली, 29 जून : कोरोना साथीमुळे सध्या अर्थव्यवस्था ढेपाळली असल्याने ग्राहक वर्ग मोठ्या खरेदीच्या योजना पुढे ढकलत आहे किंवा स्थगित करत आहे. त्यामुळे वाहन कंपन्या, बांधकाम क्षेत्र आदी उद्योगांवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना वाहन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने वाहन उत्पादक कंपन्या विविध आकर्षक सवलती देत आहेत. देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki India) आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. या योजनेत ग्राहकांना कार खरेदी करण्याची गरज नाही. मासिक भाडेतत्त्वावर ग्राहक आपली आवडती कार (Car on Monthly Rent) घरी आणू शकतात. कंपनीने जुलै 2020 मध्ये ही योजना दाखल केली होती. त्यावेळी मर्यादित शहरात उपलब्ध असणाऱ्या या अभिनव योजनेची व्याप्ती आता जयपूर, इंदूर, मँगलोर आणि म्हैसूर या शहरांमध्ये वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना आता 19 शहरांमध्ये उपलब्ध झाली असून, अनेक ग्राहकांना आपलं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे. या योजनेअंतर्गत ग्राहक मारुती कारला निश्चित कालावधीसाठी मासिक भाडेतत्वावर (Monthly Subscription) घरी आणू शकतात. या मासिक शुल्कामध्ये वाहन वापर शुल्क, नोंदणी शुल्क, देखभाल, विमा आणि वाहन वापराशी संबंधित इतर सेवांचा समावेश आहे.

(वाचा - Google ने भारतात लाँच केलं Job Search App, नोकरी शोधण्यासाठी होईल मदत)

एका सबस्क्रिप्शनचा कालावधी संपल्यानंतर ग्राहक त्यांची इच्छा असल्यास दुसरी कार सबस्क्रिप्शनवर घेऊ शकतात. तसंच इच्छा असल्यास ग्राहक सबस्क्रिप्शन प्लॅन अंतर्गत चालविलेली कार खरेदीही करू शकतात. त्याचप्रमाणे ग्राहक त्याच्या मर्जीनुसार सबस्क्रिप्शन प्लॅन बंद करू शकतो. हा पर्याय ग्राहकांसाठी नेहमीच खुला असतो. कंपनीनं या योजनेत सहभागी होण्यासाठी एक मार्केटप्लस मॉडेल दाखल केलं आहे. वेगवेगळ्या भागीदारांच्या सहकार्याने ग्राहकांना कार उपलब्ध करून देण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यात आला आहे. या कार होतील उपलब्ध - ओरिएक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस लिमिटेड, एएलडी ऑटोमोटिव्ह इंडिया आणि माईल्स ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या मारुती सुझुकीच्या सबस्क्राइब प्लॅटफॉर्मच्या भागीदार आहेत. वॅगनआर (WagonR), स्विफ्ट (Swift), डिजायर (Dzire), विटारा ब्रिझा (Vitara Brezza) आणि एर्टिगा (Ertiga) आदी कारमधून आपल्या आवडीची कार ग्राहक निवडू शकतात.

(वाचा - तुमच्या कारमध्ये Airbag आहे का? चारचाकी असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी)

ग्राहकांसाठी व्हाईट आणि ब्लॅक प्लेट सबस्क्रिप्शनचा (White and Black Plate Subscription) पर्यायदेखील देण्यात आला आहे. व्हाईट प्लेटचा पर्याय स्वीकारल्यास कारची ग्राहकाच्या नावानं नोंदणी होते, तर ब्लॅक प्लेट सबस्क्रिप्शनमध्ये, कार सबस्क्रिप्शन पार्टनरच्या नावावर नोंदवलं जातं. तसंच 12, 24, 36 किंवा 48 महिन्यांसाठी किंवा वार्षिक 10 हजार, 15 हजार, 20 हजार आणि 25 हजार किलोमीटर अंतर चालवण्याच्या पर्यायानुसारही ग्राहक कार भाडेतत्वावर घेऊ शकतात.
First published:

Tags: Maruti suzuki cars

पुढील बातम्या