मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Malware Apps: ही 8 Android अ‍ॅप्स तुमच्या स्मार्टफोनसाठी आहेत धोकादायक, आजच करा डिलीट अन्यथा चोरी होईल माहिती

Malware Apps: ही 8 Android अ‍ॅप्स तुमच्या स्मार्टफोनसाठी आहेत धोकादायक, आजच करा डिलीट अन्यथा चोरी होईल माहिती

Malware Apps: ही 8 Android अ‍ॅप्स तुमच्या स्मार्टफोनसाठी आहेत धोकादायक, आजच करा डिलीट अन्यथा चोरी होईल माहिती

Malware Apps: ही 8 Android अ‍ॅप्स तुमच्या स्मार्टफोनसाठी आहेत धोकादायक, आजच करा डिलीट अन्यथा चोरी होईल माहिती

Autolycos नावाचं मालवेअर किमान 8 अँड्रॉइड अ‍ॅप्समध्ये सापडलं आहे, जे ३० लाखांहून अधिक वेळा डाउनलोड केलं गेलं आहे. मालवेअरमुळे प्रभावित झालेले हे 8 प्रकारचे अ‍ॅप वापरकर्त्यांना कॅमेरा एडिटर, कीबोर्ड थीम आणि व्हिडिओ एडिटर सारखी वैशिष्ट्ये देतात.

पुढे वाचा ...

मुंबई, 21 जुलै: भारतासह अनेक देशांमध्ये सायबर गुन्हे झपाट्यानं वाढले आहेत. सायबर गुन्हेगार फसवणूकीसाठी नवीन पद्धतींचा अवलंब करत आहेत, ज्यापैकी एक पद्धत म्हणजे व्हायरस आणि मालवेअर पाठवून लोकांना फसवणं. हे लक्षात घेता, फ्रेंच सुरक्षा संशोधक मॅक्झिम इंग्राओ (Maxime Ingrao) यांनी मालवेअरच्या नवीन फॅमिलीबद्दल अलर्ट केलं आहे. प्रीमियम सेवेचं सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर हा मालवेअर डिव्हाइसमध्ये प्रवेश करतो, अशी माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले की Autolycos नावाचं मालवेअर किमान 8 अँड्रॉइड अ‍ॅप्समध्ये (Harmful Malware Apps) आढळलं आहे, जे 3 दशलक्षपेक्षा जास्त वेळा डाउनलोड केलं गेलं आहेत. मालवेअरमुळे प्रभावित झालेले हे 8 प्रकारचे अ‍ॅप वापरकर्त्यांना कॅमेरा एडिटर, किबोर्ड थीम आणि व्हिडिओ एडिटर सारखी वैशिष्ट्ये देतात. एकदा डिव्हाइसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते तुमचा क्रेडेन्शियल डेटा चोरतात. हा डेटा ते चुकीच्या पद्धतीने वापरून तुम्हाला त्रास देऊ शकतात.

मॅक्झिम इंग्राओंनी एका ट्विटमध्ये लिहिलंय की,  "मालवेअरची एक नवीन फॅमिली सापडली आहे, जे प्रीमियम सेवांचे सदस्यत्व घेतं. जून 2021 पासून Play Store वरून ही 8 अ‍ॅप 30 लाखांहून अधिक वेळा डाउनलोड केली गेली आहेत. हा ऑटोलायकोस नावाचा व्हायरस आहे. त्याच वेळी, एका रिपोर्टनुसार, Google ने हे 8 अ‍ॅप्स 6 महिन्यांपूर्वीच काढून टाकले आहेत, परंतु त्याची APK आवृत्ती अद्याप ऑनलाइन उपलब्ध आहेत.

हेही वाचा: Aadhaar Card: ना भिजणार ना फाटणार! केवळ 50 रुपयांत मिळवा PVC आधार कार्ड, फॉलो करा ही प्रोसेस

याला ब्राउझर अंतर्गत C2 पत्त्यावर JSON 68.183.219.190/per/y पत्ता प्राप्त होतो. त्यानंतर ते url कार्यान्वित करते. मग हळूहळू उपकरणात प्रवेश करतो. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जाहिरातींच्या माध्यमातून सोशल मीडियावर या अ‍ॅप्लिकेशन्सचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जातो, असंही मॅक्झिम इंग्राओ यांनी सांगितलं. दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, ऍप्लिकेशनचा प्रचार करण्यासाठी फसवणूक करणारे अनेक फेसबुक पेज तयार करतात आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जाहिराती चालवतात. उदाहरणार्थ, Razer किबोर्ड आणि थीम मालवेअरसाठी 74 जाहिराती होत्या

मॅक्झिम इंग्राओ यांनी सांगितलेल्या 8 मालवेअर अ‍ॅपची यादी -

  1. व्लॉग स्टार व्हिडिओ एडिटर (com.vlog.star.video.editor)
  2. क्रिएटिव्ह 3D लाँचर (app.launcher.creative3d)
  3. फनी कॅमेरा (com.okcamera.funny)
  4. वाउ ब्युटी कॅमेरा (com.wowbeauty.camera)
  5. GIF इमोजी कीबोर्ड (com.gif.emoji.keyboard)
  6. रेझर कीबोर्ड आणि थीम (com.razer.keyboards-हे गेमिंग आणि टेक कंपनी Razer शी संबंधित नाही)
  7. फ्रीग्लो कॅमेरा 1.0.0 (com.glow.camera.open)
  8. कोको कॅमेरा v1.1 (com.toomore.cool.camera)

First published:
top videos

    Tags: Apps, Malware, Smartphone, Smartphones, Virus