मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

देशात 50 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनं; पाहा महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर

देशात 50 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनं; पाहा महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर

इलेक्ट्रीक वाहनांमुळे दुहेरी फायदा होत आहे. एकीकडे इंधन बचत होत आहे तर दुसरीकडे पर्यावरणाचं रक्षणदेखील होत आहे.

इलेक्ट्रीक वाहनांमुळे दुहेरी फायदा होत आहे. एकीकडे इंधन बचत होत आहे तर दुसरीकडे पर्यावरणाचं रक्षणदेखील होत आहे.

इलेक्ट्रीक वाहनांमुळे दुहेरी फायदा होत आहे. एकीकडे इंधन बचत होत आहे तर दुसरीकडे पर्यावरणाचं रक्षणदेखील होत आहे.

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) वापराकडे देशभरातील नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. या वाहनांच्या खरेदीवर जीएसटी, नोंदणी तसंच अन्य चार्जेसमध्ये सूट देण्यासह सरकार वाहन खरेदीकरिता अनुदानदेखील देत आहे. त्यामुळे साहजिकच वाहन खरेदीदार आकर्षित होत आहेत. इलेक्ट्रीक वाहन वापरात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 5911 इलेक्ट्रिक वाहनांचा वापर होत आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Disel) दरांत सातत्याने वाढ होत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केल्यास इंधन खर्चावर चांगली बचत करता येईल आणि आपल्या शहरातील प्रदुषण पातळीही नियंत्रणात येईल, असे नागरिकांना वाटते. जाणून घ्या देशातील एकूण इलेक्ट्रीक वाहनांची संख्या आणि त्याच्या फायद्याबाबत.

नॅशनल ऑटोमोटिव्ह बोर्डाने (NAB) दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या सुमारे 50,577 इलेक्ट्रिक वाहनं आहेत. त्यात दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. या वाहनांच्या वापरामुळे दैनंदिन 43,316 लीटर पेट्रोल-डिझेलची बचत होत आहे. आतापर्यंत यामुळे 1 कोटी 44 लाख 12 हजार 700 लीटर पेट्रोल-डिझेलची बचत झाली आहे. जर आपण पेट्रोल-डिझेलची सरासरी किंमत 80 रुपये गृहित धरली, तर दररोज 3 लाख 46 हजार 5280 रुपयांची बचत होत आहे. आतापर्यंत या 50,577 वाहनांमुळे आणि पेट्रोल-डिझेलचा वापर न केल्याने 1 अब्ज 44 लाख 12 हजार 700 रुपयांची बचत झाली आहे.

पर्यावरणाला सर्वाधिक फायदा

देशभरात 50,577 इलेक्ट्रीक वाहनांमुळे जशी इंधन बचत झाली आहे, तसाच पर्यावरणाला देखील मोठा फायदा होताना दिसत आहे. नॅशनल ऑटोमोटिव्ह बोर्डाच्या (NAB) माहितीनुसार, इलेक्ट्रिक वाहन वापरामुळे दररोज सुमारे 99 हजार किलो कार्बन डायऑक्साइडचे (Co2) उत्सर्जन रोखता येणं शक्य आहे. आतापर्यंत 3 कोटी 28 लाख किलोपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन रोखलं गेलं असल्यानं पर्यायाने पर्यावरणाला (Environment) फायदाच झाला आहे. जर 50 हजार इलेक्ट्रीक वाहनं वापरल्याने पर्यावरणाला एवढा फायदा होत असेल, तर या वाहनांची संख्या अजून वाढली तर किती फायदा होईल, ही बाब विचार करण्याजोगीच आहे.

(हे देखील वाचा -  ट्वीटरसोबतच्या वादामुळे केंद्र सरकार लवकरच KOO App ला माहितीचं प्रमुख माध्यम बनवणार, सूत्रांची माहिती)

देशात कर्नाटक सर्वात पुढे -

इलेक्ट्रिक वाहन वापरात देशात कर्नाटक (Karnatak) राज्य सर्वात पुढे पहिल्या क्रमांकावर आहे. या राज्यात सर्वाधिक 12,512 इलेक्ट्रिक वाहने असून त्यात 12 हजार टू व्हिलर, 387 कार्स, 250 थ्रीव्हिलर्स आहेत. त्यानंतर तामिळनाडू (TamilNadu) आघाडीवर असून, या राज्यात सुमारे 7266 इलेक्ट्रिक वाहने आहेत.

महाराष्ट्र ( Maharashtra) तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 5911 इलेक्ट्रीक वाहने आहेत. 4124 वाहनांसह उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) चौथ्या, तर 3808 वाहनांसह दिल्ली (Delhi) पाचव्या क्रमांकावर आहे. भारतात सध्या सुमारे 25 कोटी 30 लाख वाहने ही पेट्रोल- डिझेलवरील आहेत. 2030 पर्यंत भारतात किमान 30 टक्के वाहने ही इलेक्ट्रिकवरील असतील, असं उदिदष्ट सरकारने ठेवलं आहे.

First published:

Tags: Car, Maharashtra, Petrol and diesel price, Tesla electric car