नवी दिल्ली, 26 मार्च : कोरोना व्हायरमुळे देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे लोक घरातच अडकले आहेत. या परिस्थितीत इंटरनेट वापरणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं येत येणारा लोड आणि लोकांच्या सोयीसाठी टेलिकॉम कंपन्यांनी काही सेवा पुरवल्या आहेत. यामध्ये आता एअरटेलनं त्यांचे इ-बुक जगरनॉट बुक्स फ्री केलं आहे.
एअरटेनं म्हटलं की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउनची घोषणा केली. याला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वाचण्याची आवड असलेल्या लोकांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये अॅप डाउनलोड करून जगरनॉट बुक्स फ्री मध्ये दिलं आहे. यावर उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांचे आणि कादंबऱ्यांचे वाचन ग्राहकांना करता येईल. एअरटेलने 2017 मध्ये जगरनॉट बुक्स विकत घेतलं होतं.
भारती एअरटेलचे प्रमुख प्रोडक्ट ऑफिसर आदर्श नायर यांनी सांगितलं की, अशा कठीण काळात एअरटेल आणि जगरनॉट यांनी जास्ती जास्त लोक यात गुंतून रहावेत यासाठी प्रयत्न केला आहे. कारण सध्या लोक सोशल डिस्टन्सिंग करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा लोकं मागे पडत चाललेल्या वाचनसंस्कृतीकडे वळतील असा विश्वासही आदर्श नायर यांनी व्यक्त केला.
हे वाचा : जिओच्या ग्राहकांसाठी 498 रुपयांचा रिचार्ज फ्री? व्हायरल होतोय मेसेज
भारतात आतापर्यंत 600 पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. सरकारनं कोरोना रोखण्यासाठी 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. जगभरात अनेक देशांनी असे लॉकडाउन केले आहे. आतापर्यंत जगात जवळपास 16 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
हे वाचा : LockDown मुळे घरी बसलेल्या लोकांसाठी... VIDEO Streaming साठी आता कमी डेटा लागणार