मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

OMG! दहावीच्या मुलाने फक्त 3 हजारांत भंगारातून बनवली बाईक! 1 लिटर पेट्रोलमध्ये 120KM प्रवास

OMG! दहावीच्या मुलाने फक्त 3 हजारांत भंगारातून बनवली बाईक! 1 लिटर पेट्रोलमध्ये 120KM प्रवास

दहावीच्या मुलाने फक्त 3 हजारांत भंगारातून बनवली बाईक!

दहावीच्या मुलाने फक्त 3 हजारांत भंगारातून बनवली बाईक!

Lakhimpur kheri: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpuri Kheri) येथे दहावीचा विद्यार्थी असलेल्या रजनीशने भंगारातून जुगाडू बाईक तयार केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

लखीमपूर खेरी, 12 सप्टेंबर : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpuri Kheri) येथील एका दहावीच्या विद्यार्थ्याने अशी किमया साधली आहे, ज्याने या दरवाढीपासून थोडासा दिलासा मिळू शकतो. रजनीश असं या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने भंगातून बाईक तयार केली आहे. ह्या बाईकला 3,000 रुपये खर्च आला असून एक लिटर पेट्रोलमध्ये 120 किमी प्रवास होत असल्याचा दावा त्याने केला आहे.

लखीमपूर खेरीच्या मैलानी येथील कोतवाली परिसरात राहणारा दहावीचा विद्यार्थी रजनीश कुमार याला एक महागडी बाईक घ्यायची होती. पण पैशांअभावी तो करू शकला नाही. मात्र, भंगारातून वस्तू खरेदी करून सुमारे ₹3000 ची जुगाड बाइक बनवण्यात तो यशस्वी झाला. एक लिटर पेट्रोलमध्ये ही बाईक 120 किमी चालते, असा त्याचा दावा आहे.

10वीचा विद्यार्थी रजनीश कुमारने सांगितले की, त्याच्याकडे महागडी बाईक घेण्यासाठी पैसे नव्हते. पण, बाईक चालवायची खूप इच्छा होती, म्हणून स्वस्तात बाईक बनवावी म्हणजे शाळेत किंवा कुठेही जाणे सोपे जाईल असा विचार केला. यासाठी त्याने शेतात वापरले जाणारे पेट्रोलवर चालवणारे फवारणी करणारे मशीन भंगारातून खरेदी केलं.

वाचा - कच्च्या तेलाच्या किमती 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, तरी पेट्रोल-डिझेलचे दर कमी होईना? हे आहे महत्त्वाचं कारण

त्याने भंगारातून ही मशीन खरेदी केली. त्याची मोटार काढली आणि ती दुरुस्त केली, मोटारसायकलचे काही सामान घेतले आणि सायकलमध्ये काही बदल करून ती मोटार त्यात बसवली. सुमारे 1 आठवड्याच्या मेहनतीनंतर त्याने त्या सायकलचे बाईकमध्ये रूपांतर केले. आता ही जुगाड बाईक ताशी 30 किलोमीटर वेगाने धावते आणि 1 लिटरमध्ये 120 किलोमीटरचा प्रवास करते.

पेट्रोल-डिझेलच्या किमती जैसे थे

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत. साहजिकच देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असं वाटतं होतं. मात्र, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. याचे कारण म्हणजे खर्चात वाढ होऊनही सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ न केल्याने सुमारे पाच महिने तोटा सहन करावा लागत आहे.

First published:

Tags: Bike, Petrol and diesel price