मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

ऑनलाइन डेटिंग सुरक्षित ठेवण्यासाठी या 10 टिप्स करा फॉलो

ऑनलाइन डेटिंग सुरक्षित ठेवण्यासाठी या 10 टिप्स करा फॉलो

सावधान! जपून करा ऑनलाईन शॉपिंग

सावधान! जपून करा ऑनलाईन शॉपिंग

Online dating App Tips: ऑनलाइन डेटिंगच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे आणि सतत विकसित होत आहे. जवळजवळ 50 दशलक्ष लोक ऑनलाइन डेटिंग करत आहेत.

  नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी: सोशल मीडियावरील अनेक डेटिंग अ‍ॅप (Dating app) गुन्हेगारांचा नवा अड्डा बनली आहे. अशाच एका अ‍ॅपचा वापर करत पुण्यातील (Pune) एका 27 वर्षीय तरुणीने तब्बल 16 युवकांना आपल्या जाळ्यात ओढून लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. यानंतर केलेल्या एका सर्वेक्षणात डेटिंग अ‍ॅप वापरताना अनेक तरुण सुरक्षेचे कोणतेचं निकष पाळत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. परंतू डेटिंग अ‍ॅप वापरताना आपल्याल्या चांगल्या प्रकारे माहित नसलेल्या लोकांची भेट घेताना सुरक्षित कसे रहायचे हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. खालील दिलेल्या 10 टिप्स तुम्हाला सुरक्षितपणे ऑनलाइन डेटिंग करण्यासाठी मदत करतील: सेफ्टी डॉटकॉमने याबाबत अधिक माहिती दिली आहे. 1) नीट रिसर्च करा : जेव्हा डेटिंग अ‍ॅपवरून तुम्ही तुमची डेट नक्की करता तेव्हा प्रत्यक्ष भेटण्याआधी एकदा त्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न नक्की करा. त्याने डेटिंग अ‍ॅपवर जी माहिती दिली आहे. त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. त्याचा सोशल मीडिया अकाऊंट शिवाय त्याच्याबद्दल अजून जाणून घ्यायचा प्रयत्न करा. व भेटण्यापूर्वी त्याचा खरा फोटो नक्की मागवून पाहून घ्या. 2) सुरक्षेच्या दृष्टीने Google व्हॉईस नंबर वापरा: गूगल कडून तुम्हाला google voice number ची सेवा मोफत मिळत असते. सुरक्षेच्या दृष्टीने अजून एक पुढचं पाऊल म्हणुन तुम्ही अनोळखी लोकांसोबत बोलताना स्वतःच्या फोन नंबर वरून बोलण्यापेक्षा google voice number वरून बोलू शकता. Google Voice अ‍ॅपसह तुम्ही तुमचा कॉल, व्हॉईस मेल आणि मेसेजेस वास्तविक नंबर न सांगता देखील तपासू शकता. हे ही वाचा-नदी पार करणाऱ्या झेब्रावर मगरीचा हल्ला; पाहा नदीतल्या थराराचा VIDEO 3) व्हिडिओ कॉल : प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी एकदा त्या व्यक्तीशी व्हिडिओ कॉल वर बोलून घेण केव्हाही उत्तम. याने तुम्हाला समोरच्या व्यक्तीविषयी एक कल्पना येऊन जाईल. 4) पहिल्या डेट आधी फोनवर चॅट करा: डेटिंग अ‍ॅप वर प्रोफाईल पहिलं. समोरची व्यक्ती पसंत पडली आणि लगेच भेटायला होकार दिला असं बिलकुल करू नका. भेटण्याआधी समोरच्या व्यक्तीला जाणून घेणं खूप महत्वाचं असते. त्यासाठी त्या व्यक्तीशी संवाद साधा, तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करा. त्यातून भेटण्याआधी तुम्हाला त्या व्यक्तीला जाणण्याची चांगली संधी मिळेल. 5) भेटायला जाताना स्वतःची गाडी किंवा सार्वजनिक वाहतूक वापरा : जेव्हा तुम्ही डेटवर जाता तेव्हा तुमच्याबद्दलची सर्व माहिती ही बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीने आधीच काढून ठेवलेली असते. पाळत ठेवून ते तुमचा दिनक्रम तसेच येण्या-जाण्याचा रस्ता देखील माहिती करून घेऊ शकतात. आणि यामुळेच लिफ्ट देण्याच्या बहाण्याने खूपदा अपहरण करण्याचे प्रकार देखील घडलेले आहेत. त्यामुळे शक्यतो डेटवर भेटायला जाताना एकतर स्वतःची गाडी वापरा किंवा सार्वजनिक वाहतूकीचा तरी वापर करा. 6) सार्वजनिक ठिकाणी भेटा: पहिल्या एक दोन भेटीसाठी सार्वजनिक ठिकाणीचं भेटा. शक्यतो एखाद रेस्टॉरंट, कॅफे, स्केटिंग रिंक किंवा इतर ठिकाणी जिथे सामान्यतः चांगली गर्दी असते तिथे भेटा. म्हणजे जर तुम्हाला काही कारणास्तव अस्वस्थ वाटलं तर अशा परिस्थितीत आजूबाजूस इतर लोक देखील असतील. 7) तुमच्या डेट बद्दल इतर कोणाला माहिती असू दया: तुमची डेट ही पूर्णपणे गुपित ठेवू नका. तुम्हाला आई वडिलांना सांगण्यास संकोच वाटत असेल तर निदान बहिणीला, जवळच्या मैत्रिणीला किंवा भावाला सगळी माहिती देऊन मगच बाहेर पडा. तुम्ही कुठे जाताय? कोणाला भेटायला जाताय? किती वेळात घरी परत याल या सर्व गोष्टींची कल्पना त्यांच्यापैकी कोणाला तरी असणं खूप आवश्यक आहे. 8) खूप जास्त वैयक्तिक माहिती देऊ नका: कुठल्याही व्यक्तीशी ओळख झाल्यावर लगेच त्यांना स्वतःची वैयक्तिक माहिती देत बसू नका. तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती, तुमची नेहमीची फिरण्याची ठिकाणे, तुमच्या मित्र मैत्रिणींचे फोन नंबर ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला समोरच्या बद्दल विश्वास जाणवेल तेव्हा हळूहळू द्यायला सुरुवात करा.

  हे देखील वाचा -  आता BookMyShow वर चित्रपटही पाहता येणार; कंपनीची नवी स्ट्रीम सर्व्हिस सुरू

  9) मिरपूड सोबत ठेवा: तुम्हाला सोशल मीडियावरून भेटणारे सगळेच लोक चांगल्या हेतुचेच असतील हे काही गरजेचं नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी आत्मरक्षणासाठी तयार असलं पाहिजे. जर अशा भेटीवेळी काही अनुचित प्रकार घडू लागला तर तुमच्याकडे मिरपूड, एखाद टोकदार हत्यार हे नेहमी सोबत असलं पाहिजे. 10) शांत रहा: आज जवळजवळ 50 दशलक्ष लोक ऑनलाइन डेटिंग करत आहेत. त्यामुळे नवीन लोकांना भेटताना आपण शांत राहणे आणि आपली सुरक्षा लक्षात ठेवणे अजूनही महत्वाचे आहे.
  Published by:news18 desk
  First published:

  Tags: Online dating, Relationship, Social media, Social media and relationships, Social media app, Whatsapp chat

  पुढील बातम्या