जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / whatsapp update: व्हाॅटसअपवरचे चॅट Telegram वर शिफ्ट कसे करायचे?

whatsapp update: व्हाॅटसअपवरचे चॅट Telegram वर शिफ्ट कसे करायचे?

whatsapp chat

whatsapp chat

Telegram वापरायचंय पण WhatsApp डेटा नष्ट होईल अशी भीती जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चिंत राहा. जुन्या ॲपवरील सर्व चॅट्सहित डेटा (Data) मूव्ह करण्याची सुविधा आता टेलिग्रामकडून देण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : टेलिग्राम (Telegram) ॲपचा वापर करायचा आहे, मात्र व्हॉट्सॲपवरील (WhatsApp) डेटा नष्ट होईल अशी भीती जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चिंत रहा. कारण जुन्या ॲपवरील सर्व डेटा (Data) आणि चॅट (Chat) मूव्ह करण्याची सुविधा आता टेलिग्रामकडून देण्यात आली आहे. व्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसी (Privacy Policy) बदलण्याचा घेतलेला निर्णय हा युझर्समध्ये चर्चेचा विषय ठरला होता. अनेक भारतीय कंपन्या या निर्णयामुळे नाखुश होत्या. याच कारणामुळे व्हॉट्सॲपचे अनेक ग्राहक टेलिग्रामकडे वळत होते. एका अहवालानुसार आता टेलिग्राम हे नॉन-गेमिंग प्रकारातील सर्वांत जास्त डाऊनलोड केलेले अॅप ठरले आहे. हे अॅप 63 दशलक्षवेळा डाऊनलोड झाले आहे. मात्र आता व्हॉट्सॲपवरील जुन्या चॅटसचं काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर टेलिग्रामवर शिफ्ट झाल्याने व्हॉट्सॲपवरील डेटा नष्ट होईल, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तसे अजिबात नाही. कारण तुम्हाला जुन्या ॲपवरील डेटा आणि चॅट मुव्ह करण्याची सुविधा टेलिग्रामकडून देण्यात आली आहे. प्रत्येक युझर आपली चॅट हिस्ट्री (Chat History) जसे व्हिडीओ, फोटो आणि डाक्युमेंट व्हॉट्सॲपसारख्या ॲपवरुन टेलिग्रामवर मुव्ह करु शकतात. ही सुविधा केवळ वैयक्तिक किंवा पर्सनल चॅटसाठी नसून ग्रुप चॅटसाठी देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. **अॅण्ड्राईड युझर्स (**Android Users) असा करु शकतात डेटा मूव्ह - जर तुम्ही अॅण्ड्राईड युझर असाल तर प्रथम व्हॉट्सॲप ओपन करा - यानंतर सेटिंगवर क्लिक करुन चॅट हा आॅप्शन सिलेक्ट करा - यानंतर तुम्हाला चॅट हिस्ट्री हा आॅप्शन दिसेल त्यावर टॅप करा, त्यानंतर एक्सपोर्ट चॅट हा आॅप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. - त्यानंतर तुम्हाला जी चॅट मूव्ह करायची ती सिलेक्ट करा, त्यानंतर शेअर मेन्यूतून टेलिग्राम सिलेक्ट करावे. **आयओएस (**ios) युझर्स असा करु शकतात डेटा मूव्ह -जर तुम्ही आयओएस युझर असाल तर व्हॉट्सॲप चॅट मूव्ह करण्यासाठी व्हॉट्सॲपवरील कन्टेंट इन्फोवर किंवा ग्रुप इन्फोचे पेज उघडा. - यानंतर तेथील एक्सपोर्ट चॅटवर टॅप करावे आणि शेअर मेन्युमध्ये टेलिग्राम सिलेक्ट करावे.

हे देखील वाचा -  Twitter चा पर्याय Koo तसा आता Whatsapp लासुद्धा आला स्वदेशी पर्याय - Sandes

यानंतर काही सोप्या स्टेप्सनंतर मेसेज किंवा डेटा आपल्या नव्या टेलिग्राम ॲपवर तुम्हाला तारीख आणि वेळेनुसार पाहता येईल. त्याचबरोबर ज्या व्यक्तीसोबत तुम्ही चॅटींग केले असेल त्यास देखील ही चॅट पाहता येईल. तसेच मुव्ह केलेले मेसेज किंवा डेटा यामुळे तुमच्या फोनमधील जादा मेमरी वापरली जाणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात