WhatsApp युजर्ससाठी भन्नाट फिचर, आता एकाच फोनमध्ये असे वापरा दोन अकाउंट

WhatsApp युजर्ससाठी भन्नाट फिचर, आता एकाच फोनमध्ये असे वापरा दोन अकाउंट

  • Share this:

मुंबई, 8 ऑक्टोबर : पॉप्युलर इस्टंट मेसेजिंग ऍप व्हॉट्सअप WhatsApp अनेकांकडून मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. अधिकृतरित्या एका फोनमध्ये एकच व्हॉट्सअप वापरलं जाऊ शकतं. परंतु अनेक स्मार्टफोन कंपन्या डुअल सिम असणारे फोन बाजारात आणतात आणि ऍप क्लोनिंग फिचरसह येतात. या फीचरद्वारे एका फोनमध्ये दोन व्हॉट्सअप अकाउंट वापरले जाऊ शकतात.

- सर्वात आधी आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा.

- तेथे खालच्या बाजूला Dual App/Clone app/ App Twinचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

- त्यानंतर ऍप्सची यादी दिसेल. त्यात WhatsAppवर क्लिक करा.

- WhatsApp वर क्लिक केल्यानंतर Clone App चा ऑप्शन दिसेल. ते ऑन केल्यानंतर फोनमध्ये व्हॉट्सअपचा क्लोन बनून तयार होईल.

- त्यानंतर मेन्यूमध्ये WhatsAppचं आणखी एक आयकॉन क्लोन नावाने दिसू लागेल, ज्यावर फोन नंबरद्वारे रजिस्टर्ड करुन एका फोनमध्ये दोन व्हॉट्सअप वापरले जाऊ शकतात.

हे वाचा - आता चॅटिंग होणार अजूनच सोप्पं; WhatsApp आणणार 5 जबदरस्त फिचर्स

फोनमध्ये App Twin/Dual App/Clone app नसल्यास काय कराल

जर स्मार्टफोनमध्ये App Twin/Dual App/Clone app हे ऑप्शन नसल्यास गुगल प्ले स्टोरवर असणाऱ्या क्लोन मेकिंग ऍपचा वापर करता येऊ शकतो. आयफोन यूजर्स दोन WhatsAppचा वापर करु शकत नाहीत.

हे वाचा - आयातीवर बंदी आणल्यानंतर आता Samsung भारतातच सुरू करणार टीव्हीचं उत्पादन

कंम्प्युटरवरही एकापेक्षा अधिक WhatsApp वापरणं सोपं आहे. त्यासाठी कंम्प्युटरवर whatsapp web ओपन करा, त्यानंतर QR कोड स्कॅन करुन पहिलं अकाऊंट वापरता येईल. त्यानंतर dyn.web.whatsapp.com ओपन करुन दुसऱ्या अकाऊंटचा QR code कोड स्कॅन करुन दुसरं whatsapp अकाउंट वापरता येऊ शकतं.

हे वाचा - Apple, Xiaomi सह अनेक मोबाईल फोन महागण्याची शक्यता; हे आहे कारण

Published by: Karishma Bhurke
First published: October 8, 2020, 10:43 AM IST
Tags:

ताज्या बातम्या