CBSE 10th Result: दहावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट आली समोर; रोल नंबरशिवाय बघता येणार निकाल

विशेष म्हणजे यंदा रोल नंबरशिवायही विद्यार्थ्यांना निकाल बघता येणार आहे.

विशेष म्हणजे यंदा रोल नंबरशिवायही विद्यार्थ्यांना निकाल बघता येणार आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 20 जुलै:  राज्यात दहावीचा निकाल (SSC Result 2021) लागल्यानंतर आता CBSE चा दहावी आणी बारावीचा (CBSE 10th Result 2021) निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं लक्ष लागलं आहे. गेल्याकाही दिवसापासून CBSE बोर्ड शाळांकडून विद्यार्थ्यांचा डेटा मागवत आहे. त्यानुसार 20 ऑस्ग्स्ट रोजी निकाल लागणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता काही कारणांमुळे दहावी CBSE चा निकाल (CBSE 10th Result date) काही काळ पुढे जाण्याची शक्यता आहे. मात्र बोर्डाकडून निकाल कुठे बघता येईल (CBSE 10th result website) आणि रोल नंबर कसा शोधता (How to find Roll Number) येईल याबद्दल माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदा रोल नंबरशिवायही विद्यार्थ्यांना निकाल बघता येणार आहे. CBSE दहावीचे विद्यार्थी cbseresults.nic.in या वेबसाईटवर जाऊन आपला दहावीचा निकाल बघू शकणार आहेत. त्यासाठी त्यांना त्यांचा रोल नंबर एंटर करावा लागणार आहे. मात्र यंदा कोरोनामुळे प्रवेशपत्र (Admit Card) मिळण्याच्या आधीच परीक्षा रद्द करण्याची वेळ आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे रोल नंबर अजूनही देण्यात आले नाहीत. हे वाचा -MH 12th Result 2021: 'या' तारखेला लागणार बारावीचा निकाल? बघा ताज्या अपडेट्स विद्यार्थ्यांना त्यांचे रोल नंबर्स जाणून घेण्यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे. CBSE बोर्ड लवकरच शाळांना विद्यार्थ्यांचे रोल नंबर्स पाठवण्यास परवानगी देणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेकडून रोल नंबर्स (Roll Numbers CBSE) कळू शकणार आहेत. मात्र निकाल लागल्यानंतरही विद्यार्थ्यांकडे रोल नंबर्स नसतील तर विद्यार्थी निकाल कसा बघणार असं प्रश्न काही शिक्षकांनी विचारला आहे. मात्र याचीही सोय करण्यात आली आहे. रोल नंबरशिवाय बघता येणार निकाल     आता CBSE दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना रोल नंबरशिवायही (CBSE Result without Roll Number) बघता येणार आहे. दहावीचा निकाल वेबसाईटवर जाहीर होणार आहेच मात्र त्यासोबत Digilocker वरही दिसणार आहे. म्हणूनच डिजिलॉकरमध्ये निकाल बघताना विद्यार्थी रोल नंबर नसेल तर आधार कार्डचा नंबर (Aadhar Card Number) किंवा रजिस्टर्ड मोबाइल नंबर (Registered Mobile Number) एंटर करूनही निकाल बघू शकणार आहेत. तसंच  विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाहीये अशा विद्यार्थ्यांना फेशिअल रेकॉग्नेशन सिस्टिमचा (Facial Recognition System) वापर करून निकाल बघता येणार आहे. अजूनही बऱ्याच पद्धतीनीं निकाल बघता येण्याची सोय बोर्ड करेल अशी माहिती मिळतेय.
    Published by:Atharva Mahankal
    First published: