मुंबई, 5 जुलै : अत्याधुनिक फीचर्स आणि उच्च दर्जाच्या सिक्युरिटी फीचर्समुळे अॅपल फोनचे जगभरात चाहते आहेत. एखाद्या व्यक्तीकडे आयफोन असणं हे स्टेटस सिम्बॉल समजलं जातं. कारण आयफोनच्या किंमती साधारण फोनपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. काही महिन्यांपूर्वी कंपनीने iPhone 14 लाँच केला होता. या फोनला युजर्सचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आता कंपनीने iPhone 15च्या लाँचची तयारी सुरू केली आहे. या फोनशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. अॅपल साधारणतः सप्टेंबर महिन्यात आपला नवीन फोन लाँच करते. त्यानुसार आता कंपनीचा नवा फोन म्हणजेच iPhone 15च्या लाँचसाठी केवळ दोन महिने शिल्लक असल्याचं म्हटलं जात आहे. ‘इंडिया टुडे’ने याबाबत वृत्त दिलं आहे. त्यानुसार, जर कंपनीने iPhone 15ची किंमत पूर्वी निश्चित केल्याप्रमाणेच ठेवली तर भारतात हा फोन अंदाजे 80 हजार रुपयांना मिळेल. टिपस्टर डॅन इव्हजने दावा केला आहे की, iPhone 15 प्रो मॉडेल्सच्या किंमतीत मोठी वाढ झालेली दिसेल. ही वाढ अंदाजे 200 डॉलर्स म्हणजेच 16 हजार 490 रुपये इतकी असेल. या हिशोबानुसार, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Maxच्या किंमती अनुक्रमे 1199 डॉलर्स (98 हजार 850 रुपये) आणि 1200 डॉलर्स (1 लाख 07 हजार 090 रुपये) असतील.
कंपनीने जाहीर केल्याप्रमाणे, यंदा लाँच होणाऱ्या आयफोनमध्ये अॅपल लायटनिंग चार्जिंग पोर्टऐवजी यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट सुविधा दिली जाणार आहे. मात्र या फोनसोबतही कंपनी चार्जर देणार नाही. कारण कंपनीने iPhone 12 सीरिजपासून फोनसोबत चार्जर देण्याची सुविधा बंद केली आहे. त्यामुळे ग्राहकांना चार्जर वेगळा विकत घ्यावा लागेल. iPhone 15 सीरिजमधील सर्व व्हेरियंट्समध्ये ‘पंच होल’ डिसप्ले डिझाईन मिळणार असल्याची चर्चा आहे. iPhone 15 मध्ये अॅपलची बायोनिक A16 चिपसेट हूड आणि प्रो मॉडेल्समध्ये नवीन A17 SoC वापरलं जाण्याची शक्यता आहे. iPhone 15च्या रेग्युलर व्हर्जन्समध्ये iPhone 14 सीरिजमधील प्रो मॉडेल्समध्ये वापरण्यात आलेला 48 मेगापिक्सेल कॅमेरा असेल. प्रो मॅक्स मॉडेलमध्ये जास्त प्रॉमिनंट कॅमेरा मॉड्युल असल्याचं म्हटलं जात आहे. ज्यात इतर सेन्सर्सशिवाय 5-6x ऑप्टिकल झूम-एनेबल्ड पेरिस्कोप लेन्स समाविष्ट आहे. ‘या’ दोन बहिणी आहेत बॉलीवूडच्या लेडी सुपरस्टार, यातील एक तर आहे राजघराण्याची सून iPhoneचे चाहते iPhone 15च्या लाँचची आतुरतेने वाट पाहत आहेत. टिपस्टर डॅन इव्हजने दिलेली माहिती खरी ठरली तर लवकरच iPhone 15 सीरिज ग्राहकांच्या हातात असेल.