मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /नको असलेल्या WhatsApp ग्रुपमध्ये Add होणं अशाप्रकारे टाळा, करा फक्त ही एक Setting

नको असलेल्या WhatsApp ग्रुपमध्ये Add होणं अशाप्रकारे टाळा, करा फक्त ही एक Setting

WhatsApp Group Setting: कधीकधी युजर्सच्या परवानगीशिवाय ग्रुपमध्ये नंबर अ‍ॅड केला जातो, जे नंतर त्रासदायक ठरतं. अनेकांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये अशाप्रकारे नंबर अ‍ॅड झाल्याचं आवडत नाही. अशा लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे.

WhatsApp Group Setting: कधीकधी युजर्सच्या परवानगीशिवाय ग्रुपमध्ये नंबर अ‍ॅड केला जातो, जे नंतर त्रासदायक ठरतं. अनेकांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये अशाप्रकारे नंबर अ‍ॅड झाल्याचं आवडत नाही. अशा लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे.

WhatsApp Group Setting: कधीकधी युजर्सच्या परवानगीशिवाय ग्रुपमध्ये नंबर अ‍ॅड केला जातो, जे नंतर त्रासदायक ठरतं. अनेकांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये अशाप्रकारे नंबर अ‍ॅड झाल्याचं आवडत नाही. अशा लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे.

  मुंबई, 03 ऑगस्ट: मित्र, नातेवाईक आणि ऑफिसमधील सहकारी यांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (WhatsApp) हा उत्तम पर्याय आहे. परंतु आपल्या सेवा, उत्पादनं यांची माहिती देण्यासाठी विविध ग्रुप काहीजण बनवतात, या ग्रुपमध्ये अनेकांचा नंबर हा अ‍ॅड (Add) केला जातो. कधीकधी तर युजर्सच्या परवानगीशिवाय ग्रुपमध्ये नंबर अ‍ॅड केला जातो, जे नंतर त्रासदायक ठरतं. अनेकांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये अशाप्रकारे नंबर अ‍ॅड झाल्याचं आवडत नाही. अशा लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे. या पर्यायामुळे युजर्सला त्याचा नंबर हा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये अ‍ॅड होण्यापासून दूर राहता येऊ शकेल.

  वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आपला नंबर घेतला जाऊ नये, यासाठी एक सेटिंग आहे. या सेटिंगमुळे युजर्स हे कस्टमाइज करू शकतात की आपला नंबर ग्रुपमध्ये कोण अ‍ॅड करू शकतो, आणि कोण नाही. हे सेटिंग सुरू केल्यानंतर एखाद्या ग्रुपमध्ये तुमचा नंबर घ्यायचा असेल तर Group Admin ला संबंधित ग्रुपमध्ये तुम्हाला घेण्यासाठी पर्सनल लिंक पाठवावी लागेल. जर तुम्हालाही व्हॉट्सअ‍ॅपवर बनवल्या जाणाऱ्या अनावश्यक ग्रुपमध्ये अ‍ॅड होणं टाळायचं असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

  हे वाचा-Electric Vehicle पॉलिसीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारचा खास प्लॅन

  - सगळ्यात अगोदर WhatsApp सुरू करा, त्यानंतर उजवीकडच्या वरच्या कोपऱ्यात दिलेल्या तीन डॉटवर टॅप करा.

  - त्यानंतर Settings च्या ऑप्शन वर जा, आणि Account वर टॅप करा.

  - तेथे Privacy या ऑप्शनवर जा, आणि Groups वर टॅप करा. तेथे ‘Everyone’ असे सेट केलेले असते. हे सेटिंग Default असते.

  - तेथे युजर्सला ‘Everyone’, ‘My Contacts’, आणि ‘My contacts Except’ हे तीन ऑप्शन पाहता येतात.

  -त्यापैकी ‘Everyone’ ऑप्शनचा अर्थ हा तुमचा नंबर ज्याच्याकडे आहे, ती व्यक्ती तुमच्या परवानगी शिवाय तुमचा नंबर कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये Add करू शकते.

  हे वाचा-प्रत्येक प्रश्नाचं उत्तर Google Search करता?मानसोपचारतज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा

  - तर ‘My Contact’ ऑप्शनचा अर्थ आहे की तुमचा नंबर त्याच व्यक्तीला ग्रुपमध्ये Add करता येईल ज्यांचा फोननंबर हा तुम्ही तुमच्या फोनमध्ये सेव्ह केला आहे.

  - शेवटी ‘My Contacts Except’ हा ऑप्शन दिलेला असेल. यात तुमच्या फोनमध्ये सेव्ह केलेल्या नंबरपैकी कुणी तुम्हाला WA ग्रुपमध्ये Add करू नये अशा लोकांची नावं तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे त्या यादीतील लोकांना त्यांच्या ग्रुपमध्ये तुम्हाला घेताना परवानगी घ्यावी लागेल.

  First published:

  Tags: Whatsapp, Whatsapp alert