Home /News /technology /

जगातील 'या' महागड्या स्मार्टफोन्सबद्दल वाचून बसेल आश्चर्याचा धक्का; लाखो रुपये आहे किंमत

जगातील 'या' महागड्या स्मार्टफोन्सबद्दल वाचून बसेल आश्चर्याचा धक्का; लाखो रुपये आहे किंमत

अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

    मुंबई, 04 जुलै : महागडे स्मार्टफोन्स (Expensive smartphones) म्हंटलं की आपल्या डोळ्यामोर येतात  Apple, Samsung , one Plus अशा काही कंपन्या. मात्र जगात असे  काही स्मार्टफोन्स आहेत ज्यांची किंमत लाखोंमध्ये आहे. विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. या स्मार्टफोनमध्ये लाखोंचे हिरे (Diamond), सोनं लागलेलं आहे. अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. Falcon Supernova I phone 6 pink diamond हा जगातील सर्वात महाग आणि लक्झरी स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत तब्बल 4.8 कोटी रुपये इतकी आहे. Apple फॉल्कन सुपरनोव्हा आयफोन 6 स्मार्टफोनसाठी उत्पादन करणारी कंपनी आहे. फोनची रचना फॉल्कनने केली आहे. हा स्मार्टफोन 24 कॅरेट सोन्यापासून तयार केला आहे, तसंच यात हिरे लागले आहेत.  याची केस रोज जेल आणि प्लॅटिनमपासून (Platinum) बनवलेली आहे. Gold Striker iPhone 3GS Supreme गोल्डस्ट्राइकर आयफोन 3G जी एस सुप्रीम स्मार्टफोन ब्रिटीश डिझायनर स्टुअर्ट ह्युजे आणि त्यांची कंपनी गोल्डस्ट्राइकर यांनी तयार केला होता. या स्मार्टफोनची किंमत तब्बल 32 लाख आहे.  हा फोन 271 ग्रॅमच्या 22 कॅरेट सोनंआणि 200 हिरे सह तयार करण्यात आला आहे. Apple च्या लोगोमध्ये देखील 53 डायमंड आणि स्टार्ट बटणावर पूर्ण हिरा लावण्यात आला आहे. हे वाचा - परीक्षेत कमी मार्क्स आलेत तर आता नो टेन्शन; या क्षेत्रांमध्ये करा करिअर  iPhone 4S Elite Gold या फोनमध्ये सुमारे 500 हिरे लावण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची किंमत तब्बल 94 लाख रुपये आहे. आयफोन 4 एस एलिट गोल्ड स्टुअर्ट ह्यूजेस यांनी डिझाइन केलं आहे. त्यात  हे संपूर्णपणे 24 कॅरेट जेलद्वारे बनवलेलं आहे. स्मार्टफोनच्या मागच्या साईडला 53 हिऱ्यांनी बनवलेला Apple चा लोगो आहे. इतकंच नाही तर यात खऱ्या डायनासॉरच्या हाडाचा तुकडाही वापरला आहे. iPhone 4 Diamond rose त्या स्मार्टफोनमध्येही डब्बा 500 हिरे आहेत. या स्मार्टफोनची किंमत तब्बल 80 लाख आहे. आयफोन 4 डायमंड रोजदेखील स्टुअर्ट ह्यूजेसनं बनवला आहे.  फोनच्या सुरुवातीच्या बटणावर सुमारे 7.4 कॅरेटच्या सिंगल कट केलेल्या हिऱ्याचं कव्हर आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Smartphones, Super expensive, World news

    पुढील बातम्या