जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / परीक्षेत कमी मार्क्स आलेत तर आता नो टेन्शन; या क्षेत्रांमध्ये करा करिअर; मिळेल भरघोस पगार

परीक्षेत कमी मार्क्स आलेत तर आता नो टेन्शन; या क्षेत्रांमध्ये करा करिअर; मिळेल भरघोस पगार

परीक्षेत कमी मार्क्स आलेत तर आता नो टेन्शन; या क्षेत्रांमध्ये करा करिअर; मिळेल भरघोस पगार

कमी मार्क्स असणारे विद्यार्थीही चांगलं करिअर करून भरघोस पैसे कमवू शकतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 जुलै: चांगलं शिकून चांगले मार्क्स आणणार नाही आणलेत तर चांगली नोकरी (Latest Jobs) मिळणार नाही आणि चांगली नोकरी मिळाली नाही तर पैसे मिळणार नाही असं नेहमीच आपल्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं मोठे लोक आपल्याला सांगत असतात. अर्थात हे काही चुकीचं नाही. चांगल्या नोकरीसाठी चांगले मार्क्स आणणं महत्त्वाचं आहेच. मात्र काही विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळू शकत नाहीत. अशा वेळी विद्यार्थी आणि पालक टेन्शन घेतात. आता आपला पाल्य चांगल्या क्षेत्रात करिअर (Career after low marks) करू शकणार नाही असं त्यांना वाटतं. मात्र आता चिंता करू नका. कमी मार्क्स असणारे विद्यार्थीही चांगलं करिअर करून भरघोस पैसे कमवू शकतात. कसे? ते वाचा. डिझायनिंगमध्ये करिअर जर तुम्हाला कलेची आवड असेल आणि तुमच्याकडे चांगली विचारशक्ती असेल तर कमी मार्क्स आणूनही डिझायनिंगमध्ये करिअर (Career in designing) घडवू शकता. ज्वेलरी डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, इंटेरिअर डिझायनिंग अशा काही डिझायनिंगच्या क्षेत्रांमध्ये तुम्ही शॉर्ट टर्म कोर्स करून करिअर करू शकता. यात तुम्हा स्वतःचा व्यवसायही सुरु करता येईल. फाईन आर्ट्समध्ये करिअर जर तुम्हाला चित्रकलेची किंवा पेंटिंगची आवड असेल तर तुम्ही फाईन आर्ट्समध्ये करिअर (Career in Fine arts) करू शकता. कारण इथे तुमचे मार्क्स नाही तर तुमच्यातील कला बघितली जाते. त्यामुळे तुम्ही ग्राफिक डिझायनिंग, चित्रकला, स्कल्प्टिंग इ. मध्ये करिअर करू शकता आणि भरघोस पैसे कमवू शकता. हे वाचा - तरुणींनो, एअर होस्टेस बनण्याचं स्वप्न बघताय? मग अंगी ‘हे’ गुण असणं महत्त्वाचं हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट ज्या लोकांना लोकांची सेवा करण्यास आवडतं त्यांच्यासाठी या करिअरच्या (Career in Hotel management) विविध संधी उपलब्ध आहेत. भारत हे पर्यटनाचं केंद्र आहे आणि दरवर्षी लाखो पर्यटकांना त्याचं आकर्षण असतं. गेल्या दशकात हॉटेल आणि आतिथ्य उद्योगात भरभराट झाली आहे. त्यामुळे कमी मार्क्स मिळाले तरी टेन्शन घेऊ नका या क्षेत्रात व्यवसाय सुरू करू शकता. फोटोग्राफीमध्ये करिअर फोटोग्राफीमधेही (career in Photography) मार्क्सपेक्षा तुमची कला महत्त्वाची असते. त्यामुळे जर तुम्ही चांगले फोटो काढू शकत असाल तर तुम्ही या क्षेत्रात नाव कमावू शकता. तसंच वेडिंग फोटोग्राफर, वाइल्डलाइफ फोटोग्राफर आणि फॅशन फोटोग्राफर म्हणून नोकरी करू शकता आणि पैसे कमावू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात