मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सीक्रेट फाईल्स हाइड करण्यासाठी भन्नाट App; पासवर्ड माहिती असणाऱ्यांनाही लागणार नाही पत्ता!

सीक्रेट फाईल्स हाइड करण्यासाठी भन्नाट App; पासवर्ड माहिती असणाऱ्यांनाही लागणार नाही पत्ता!

अनेकदा आपल्या स्मार्टफोनमध्ये अशा काही फाइल्स असतात, ज्यांना आपण इतरांच्या नजरेपासून वाचवू इच्छितो. असे अनेक अॅप्स आहेत, ज्याच्या मदतीने स्मार्टफोनमध्ये असलेल्या फाइल्स सुरक्षित ठेवल्या जाऊ शकतात. आज आपण या अॅप्सबद्दल बोलणार आहोत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : सर्वांची काही ना काही गुपितं असतात. यातील बऱ्याच गोष्टी लोक आपापल्या स्मार्टफोनमध्ये लपवून ठेवतात. मात्र, याच वेळी दुसऱ्या व्यक्तीने तुमचा फोन घेतल्यास तिलाही या गोष्टी दिसण्याचा धोका असतो. कित्येक फोटो किंवा डॉक्युमेंट्स अशी असतात जी तुम्ही इतरांना दाखवू शकत (Hide Secret files in phone) नाही, किंवा दाखवू इच्छित नाही. त्यामुळे अशावेळी स्मार्टफोनमधील काही गोष्टींसाठी विशेष लॉक उपलब्ध असणं गरजेचं ठरतं. यासाठी आम्ही तुम्हाला एक चांगले अ‍ॅप सजेस्ट करणार आहोत.

सीक्रेट फाईल्स राहतील सुरक्षित

तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, मात्र या अ‍ॅपचं नाव खरं तर ‘कॅल्क्युलेटर’ (Calculator files hiding app) असं आहे. मात्र, हे अ‍ॅप केवळ कॅल्क्युलेटरचं नाही, तर तुमच्या डिजिटल सीक्रेट फाईल्स फोनमध्ये लपवण्याचं काम करतं. साधारणपणे दुसऱ्या कोणाचा फोन हातात घेतल्यानंतर काही लोक पहिल्यांदा गॅलरी किंवा फाईल्स या अ‍ॅप्समध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. साधारणपणे कॅल्क्युलेटर कोणी उघडत नाही. त्यामुळेच तुमच्या फोनचा पासवर्ड जरी एखाद्या व्यक्तीला माहिती असेल, तरीही तुमच्या फाईल्स त्यापासून सुरक्षित (Hide files app) राहतील.

कोणालाही दिसणार नाही अ‍ॅप

तसं तर गुगल प्ले स्टोअरवर सीक्रेट फाईल्सना (Hide secret files app) लपवून ठेवणारी कित्येक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. मात्र यापैकी बरीच अ‍ॅप्स ही फाईल्स अ‍ॅपप्रमाणेच दिसतात. त्यामुळे लोक ती उघडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, Maxim Vasilkov कंपनीचं ‘कॅल्क्युलेटर लॉक हाईड अ‍ॅप फोटो’ (CalculatorLock hide app photo) हे अ‍ॅप वरकरणी कॅल्क्युलेटर असल्यामुळे त्याकडे कोणीही फिरकत नाही. या अ‍ॅपला पाच मिलियनहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे. तसंच, 78 हजारांहून अधिक लोकांनी यावर रिव्ह्यु दिला आहे. याला 4.3 स्टार रेटिंग मिळालं आहे. तसंच, याच महिन्यात 1 तारखेला याला अपडेट करण्यात आलं आहे.

Whatsapp Windows Native App: फोन बंद असतानाही करता येणार मेसेज, व्हॉट्सअ‍ॅपचं अप्रतिम फीचर लाँच

अशाप्रकारे करा डाउनलोड

हे अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी id=com.photo.vault.calculator&hl=en&gl=US) या लिंकवर क्लिक करा. याशिवाय फिशिंग नेट (Fishing Net Calculator Photo vault) या कंपनीचंही अशाच प्रकारचे एक अ‍ॅप आहे. या अ‍ॅपचं नाव कॅल्क्युलेटर – फोटो व्हॉल्ट असं आहे. हे दुसरे अ‍ॅपदेखील सुरक्षित आणि फायद्याचं आहे.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या सर्व डिजिटल सीक्रेट फाईल्स फोनमध्येच सुरक्षित ठेवू शकता. कोणत्याही व्यक्तीने तुमचा फोन घेतल्यानंतरही तिला या फाईल्स दिसणार नाहीत याची हमी हे अ‍ॅप्स खात्रीपूर्वक देतात.

First published:

Tags: Mobile app