Home /News /technology /

सततच्या रिचार्जपासून होणार सुटका; मार्केटमध्ये आले Jio चे खास प्लॅन्स

सततच्या रिचार्जपासून होणार सुटका; मार्केटमध्ये आले Jio चे खास प्लॅन्स

स्मार्टफोन (Smartphone) ही आता प्रत्येकाची गरज बनली आहे. बहुतांश गोष्टी ऑनलाइन (Online) झाल्यामुळे स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. संपर्कासोबतच आर्थिक व्यवहार, सोशल मीडियाचा वापर आदी गोष्टींसाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. प्री-पेड वापरणाऱ्या ग्राहकांची गरज ओळखून देशातल्या प्रमुख टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) डेटा आणि कॉलिंगसाठी सातत्यानं नवनवे प्लॅन्स (Plans) बाजारात आणत असतात. या कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओ (Reliance Jio) आघाडीवर आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 नोव्हेंबर-  स्मार्टफोन   (Smartphone)   ही आता प्रत्येकाची गरज बनली आहे. बहुतांश गोष्टी ऑनलाइन  (Online)  झाल्यामुळे स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. संपर्कासोबतच आर्थिक व्यवहार, सोशल मीडियाचा वापर आदी गोष्टींसाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. प्री-पेड वापरणाऱ्या ग्राहकांची गरज ओळखून देशातल्या प्रमुख टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) डेटा आणि कॉलिंगसाठी सातत्यानं नवनवे प्लॅन्स (Plans)  बाजारात आणत असतात. या कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओ  (Reliance Jio)  आघाडीवर आहे. जिओनं ग्राहकांसाठी वैविध्यपूर्ण असे प्लॅन्स ऑफर केले आहेत. जिओचे प्लॅन्स हे सामान्यतः 14 दिवस ते 365 दिवस कालावधीकरिता असतात. परंतु, प्लॅन्सची लिस्ट पाहून अनेकदा ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. त्यातच सततच्या रिचार्जला वैतागलेले ग्राहक प्लॅन्सची यादी पाहून आणि गरजेचा प्लॅन निवडण्याबाबत अधिकच संभ्रमात पडतात. तुमची स्थिती अशीच काहीशी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण जिओनं आता अगदी रास्त दरात अधिक कालावधीचे आणि चांगले बेनिफिट देणारे प्लॅन्स लॉंच केले आहेत. याविषयीची माहिती `लाइव्ह हिंदुस्तान डॉट कॉम`ने दिली आहे. देशातली सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओनं ग्राहकांसाठी काही नवे प्लॅन्स लॉंच केले आहेत. परंतु, एकूणच प्लॅन्सची यादी पाहता आपल्या गरजेचा प्लॅन नेमका कोणता हे निवडताना ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते. कारण काही प्लॅन्स अधिक डेटा ऑफर करतात, तर काही प्लॅन स्वस्त आहेत, परंतु कमी डेटा (Data) ऑफर करतात. परंतु, जिओचा असाही एक प्लॅन आहे की ज्याचा कालावधी तीन महिने आहे. यामुळे तुम्हाला वारंवार रिचार्ज करावं लागणार नाही.रिलायन्स जिओचा 329 रुपयांचा प्लॅन हा सुमारे तीन महिन्यांचा आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी (Validity) 84 दिवस आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 6 GB डेटा मिळतो. या प्लॅननुसार ग्राहकांना फ्री कॉलिंग, 100 एसएमएसची सुविधा मिळते. त्याचप्रमाणे जिओ अॅप्सचं (Jio Apps) सब्सक्रिप्शनदेखील ग्राहकांना मिळतं. (हे वाचा:अतिशय स्वस्तात मिळतोय Apple चा हा पॉप्युलर iPhone, पाहा काय आहे ऑफर) जिओचा 599 आणि 888 रुपयांचा प्लॅनदेखील ग्राहकांसाठी उपयुक्त असा आहे. या दोन्ही प्लॅन्सचा कालावधी 84 दिवसांचा आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना फ्री कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस या सुविधा दिल्या जातात. 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये एकूण 168 GB डेटा ग्राहकांना दिला जातो. 888 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 173 GB डेटा ग्राहकांना मिळतो. तसंच एका वर्षासाठी Disney+Hotstar Mobile सब्सक्रिप्शनदेखील दिलं जातं. या दोन्ही प्लॅन्समध्ये ग्राहकांना जिओ अॅप्स सब्सक्रिप्शन फ्री दिलं जातं.जिओनं ग्राहकांना तीन महिने कालावधीसाठी 555 रुपयांचा प्लॅनदेखील उपलब्ध करून दिला आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा मिळतो. या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना एकूण 126 GB डेटा मिळतो. जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना फ्री कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसदेखील मिळतात. त्याचप्रमाणे जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शन फ्री मिळतं.
    First published:

    Tags: Reliance Jio

    पुढील बातम्या