मुंबई, 29 ऑगस्ट : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची RIL वार्षिक सर्वसाधारण बैठक आज पार पडली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि एमडी मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) सांगितले की, रिलायन्सने रोजगार निर्मितीत नवा विक्रम केला आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायांमध्ये 2.32 लाख नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. रिलायन्स रिटेल आता भारतातील सर्वात मोठी नोकरी निर्माण करणारी कंपनी आहे.
मुकेश अंबानी यांनी पुढे म्हटलं की, जगाच्या काही भागात तीव्र आर्थिक ताण आहे. या आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेमध्ये भारत खंबीरपणे उभा आहे. याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो.
दिवाळीआधी 5G सेवा सुरु होणार
दिवाळीपूर्वी देशात जिओ 5G ची सुरु होणार असल्याची घोषणा देखील मुकेश अंबानी यांनी यावेळी केली. पहिल्या टप्प्यात देशातील प्रमुख महानगरांमध्ये 5 G सेवा सुरु होणार आहे. मुंबईमध्ये दिवाळीपूर्वी जिओ 5G सेवा लाँच होणार आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली अशा महानगरांसह काही मोठ्या शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात ही सेवा सुरु केली जाणार आहे. डिसेंबर 2023 पर्यंत देशभरातील प्रत्येक शहर, तालुक्यापर्यंत जिओ 5G पोहोचणार आहे.
रिलायन्स वार्षिक कमाई 100 अब्ज डॉलर पार करणारी भारतातील पहिली कॉर्पोरेट बनली आहे. रिलायन्सचा एकत्रित महसूल 47% वाढून 7.93 लाख कोटी किंवा 104.6 अब्ज डॉलर झाला आहे. रिलायन्सच्या वार्षिक एकत्रित EBITDA ने 1.25 लाख कोटींचा महत्त्वाचा टप्पा पार केला, अशी माहिती देखील यावेळी मुकेश अंबानी यांनी दिली.
(Disclaimer: Network18 आणि News18lokmat चॅनेल/वेबसाइट ची संचालक संस्था ही एक स्वतंत्र मीडिया ट्रस्ट आहे ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.