• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • Jio च्या या Recharge प्लॅनमध्ये डेली डेटा संपण्याचं नो टेन्शन, जाणून घ्या Airtel आणि VI चे परवडणारे रिचार्ज

Jio च्या या Recharge प्लॅनमध्ये डेली डेटा संपण्याचं नो टेन्शन, जाणून घ्या Airtel आणि VI चे परवडणारे रिचार्ज

ग्राहकांच्या गरजा ओळखून टेलिकॉम कंपन्या प्लॅन ऑफर करत असतात. त्यातही इंटरनेटचा वापर वाढल्याने युजर्सकडून अनलिमिटेड डेटा (Unlimited Data) असलेल्या प्लॅन्सनाच प्राधान्य दिलं जातं.

  • Share this:
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि वोडाफोन-आयडिया (Vi) या देशातल्या प्रसिद्ध मोबाईल नेटवर्क प्रोव्हायडर कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी अधिकाधिक चांगले प्लॅन्स (Plans) लाँच करत असतात. या प्लॅनसोबत ओटीटी प्लॅटफॉर्म चॅनेलचं सबस्क्रिप्शन, अनलिमिटेड कॉल्स, तसंच अन्य सुविधाही युजर्सना संबंधित कंपनीकडून दिल्या जातात. आपल्या युजर्सची संख्या वाढावी, हा त्यामागचा प्रमुख उद्देश असतो. युजर्सदेखील आपल्या गरजेनुसार प्लॅनची निवड करत असतात. ग्राहकांच्या गरजा ओळखून  टेलिकॉम कंपन्या प्लॅन ऑफर करत असतात. त्यातही इंटरनेटचा वापर वाढल्याने युजर्सकडून अनलिमिटेड डेटा (Unlimited Data) असलेल्या प्लॅन्सनाच प्राधान्य दिलं जातं. जिओचा 447 रुपयांचा प्रीपेड प्लॅन - जिओच्या (Jio) 447 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये (Prepaid Plan) 50 GB डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आहे. याशिवाय हा प्लॅन खरेदी केल्यास तुम्ही दररोज 100 एसएमएस (SMS) पाठवू शकता. या प्लॅनची व्हॅलिडिटी 60 दिवस असते. याशिवाय हा प्लॅन खरेदी केल्यास त्यात जिओ अ‍ॅप्स, जिओ टिव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउड यांसारख्या सुविधांचं सबस्क्रिप्शन फ्री मिळतं. याशिवाय जिओचा 349 रुपयांचा नियमित प्लॅनदेखील आहे. यात 3GB डेली डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 100 एसएमएस पाठवता येतात. याशिवाय या प्लॅनसोबत जिओ अ‍ॅप्सचं कॉम्प्लिमेंटरी सबस्क्रिप्शनही (Subscription) मिळतं. एअरटेल 448 रुपयांचा प्लॅन - एअरटेलच्या 448 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3GB हायस्पीड डेटा (High Speed Data) मिळतो. याशिवाय कोणत्याही अन्य नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सुविधा, तसंच दररोज 100 SMS मिळतात. या प्लॅनची मुदत 28 दिवस आहे. याशिवाय या प्लॅनसोबत युजरला Disney+Hotstar VIP चं एक वर्षाचं फ्री सबस्क्रिप्शन, तसंच प्राइम व्हिडीओचं सबस्क्रिप्शनदेखील मिळतं. Airtel Xstream Premium, अनलिमिटेड बदलासह हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकची (Wynk Music) सुविधा मिळते.

तुमच्या सोबत Online Fraud झालाय? बँक या परिस्थितीत देईल नुकसान भरपाई

VI 449 रुपयांचा प्लॅन - वोडाफोन-आयडियाच्या 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला दररोज 4GB डेटासह zee5 चं प्रीमियम सबस्क्रिप्शन, रात्री 12 ते पहाटे 6 वाजेपर्यंत मोफत डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड मोफत कॉल्स आणि दररोज 100 SMS चाही समावेश आहे. या प्लॅनची मुदत 56 दिवस आहे. या प्लॅनमध्ये डेटा रोल ओव्हर (Roll Over) आणि Vi मूव्हीज आणि टीव्ही अ‍ॅपचं सबस्क्रिप्शनदेखील दिलं जातं.
First published: