Home /News /technology /

Jeff Bezos 11 मिनिटांची ऐतिहासिक अंतराळ सफर करून उतरले धरतीवर; नोंदवले 2 नवे विक्रम, पाहा Video

Jeff Bezos 11 मिनिटांची ऐतिहासिक अंतराळ सफर करून उतरले धरतीवर; नोंदवले 2 नवे विक्रम, पाहा Video

रिचर्ड ब्रँडसन (Richard Brandson) यांच्या यशस्वी अंतराळ उड्डाणानंतर आता अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस (Jeff Bezos) यांनीदेखील अंतराळाची सफर (Space tour) पूर्ण केली आहे.

    टेक्सास, 20 जुलै :  रिचर्ड ब्रँडसन (Richard Brandson) यांच्या यशस्वी अंतराळ उड्डाणानंतर आता अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनीदेखील अंतराळाची सफर (Space tour) पूर्ण केली आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता बेझॉस यांचं रॉकेट (Rocket) अंतराळात झेपावलं आणि 11 मिनिटांची यशस्वी अंतराळ सफर करून पृथ्वीवर परत आलं. जेफ बेझोस आणि इतर तिघांनी केलेल्या या उड्डाणामुळे जगाला आणखी 4 नवे अंतराळवीर मिळाले असून यातून दोन नवे विक्रमही नोंदवले गेले आहेत. असं केलं उड्डाण जेफ बेझॉस यांची कंपनी ‘ब्लू ओरिजिन’च्या न्यू शेपर्ड नावाच्या रॉकेटमधून ही भरारी घेण्यात आली होती. या रॉकेटची अंतराळातील ही पहिलीच झेप होती. या उड्डाणासाठी वेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. अंतरिक्षात गेल्यानंतर या रॉकेटला जोडलेलं कॅप्सूल वेगळं होतं आणि रॉकेटमधील प्रवाशांना गुरुत्वाकर्षणरहित वातावरणाचा अनुभव घेता येतो. 11 मिनिटांचं हे उड्डाण टेक्सासमधील लॉन्च साईटवरून घेण्यात आलं होतं. नवं रेकॉर्ड या रॉकेटमध्ये जेफ बेझॉस यांच्यासोबत इतर तीन व्यक्ती होत्या. त्यामध्ये जेफ यांचे भाऊ मार्क बेझॉसदेखील होते. याशिवाय 82 वर्षांचे वॉली फन्क यांनीदेखील या रॉकेटमधून अंतराळाची सफर केली. आतापर्यंत अंतराळात झेपावणारे वॉली हे सर्वात वयोवद्ध व्यक्ती ठरले आहेत. तर यातील चौथी म्हणजे 18 वर्षांचे ओलिवर डेमेन हे अंतराळात झेपावणारी जगातील सर्वात तरूण व्यक्ती ठरली आहे. हे वाचा -भारतात Tiktok चं कमबॅक होणार? या नावाने कंपनी करणार रिएन्ट्री सामान्यांचं स्वप्न पूर्ण होणार सर्वसामान्यांचं अंतराळ सफरीचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं आणि मोठं पाऊल मानलं जात आहे. सलग दोन अंतराळ सफरी यशस्वी झाल्यामुळे या तंत्रज्ञानावर आधारित अंतराळ सफरींना विविध कंपन्या सुरुवात करतील, अशी आशा आहे. सध्या तरी अंतराळाची सफर हा जगातील श्रीमंतांनाच परवडणारा भाग असला, तरी हळूहळू हे तंत्रज्ञान सामान्यांच्याही आवाक्यात येण्याची शक्यता आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Aeronautics, Amazon

    पुढील बातम्या