Home /News /technology /

computer मध्ये मालवेअर आहे का? अगदी सोप्या पद्धतीने करता येईल स्कॅन

computer मध्ये मालवेअर आहे का? अगदी सोप्या पद्धतीने करता येईल स्कॅन

हे सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर तुमच्या पीसीचं सध्याचं स्टेटस काय आहे याची समरी (PC Status summary) तुम्हाला दिसेल.

हे सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर तुमच्या पीसीचं सध्याचं स्टेटस काय आहे याची समरी (PC Status summary) तुम्हाला दिसेल.

हे सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर तुमच्या पीसीचं सध्याचं स्टेटस काय आहे याची समरी (PC Status summary) तुम्हाला दिसेल.

    मुंबई, 09 ऑक्टोबर : तुम्हाला असं वाटत असेल की, तुमच्या कॉम्प्युटरमध्ये मालवेअर आहे किंवा तुम्हाला तुमचा कॉम्प्युटर स्कॅन करून (Scan PC for MAlware) घ्यायचा असेल, तर आता त्यासाठी महागडं सॉफ्टवेअर विकत घेण्याची गरज नाही. मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये असलेल्या बिल्ट-इन सिक्युरिटी (Windows built in security tool) टूलचा वापर करून तुम्ही घरबसल्या आपला पीसी स्कॅन करून (Scan PC with windows) घेऊ शकता. विंडोज सिक्युरिटी (Windows Security) असं या टूलचं नाव आहे. याचा वापर कसा करायचा हे समजल्यानंतर तुम्हाला दुसरं कोणतंही थर्ड पार्टी सॉफ्टवेअर विकत घ्यावं लागणार नाही. विंडोज सिक्युरिटी हे खरंतर आधीच्या विंडोज डिफेंडर सिक्युरिटी सेंटरचं (Windows defender security center) पुढचं व्हर्जन आहे. तुम्ही यापूर्वी विंडोज डिफेंडर वापरलं असेल, तर तुमच्या लक्षात येईल, की ही दोन्ही सॉफ्टवेअर्स बऱ्यापैकी सारखीच आहेत. आता स्टार्ट मेन्यूमध्ये विंडोज डिफेंडर असं टाइप केल्यानंतर विंडोज सिक्युरिटी हा पर्याय तुम्हाला समोर दिसेल. दरम्यान, मायक्रोसॉफ्ट त्यांच्या खऱ्या अँटीव्हायरस स्कॅनिंग सॉफ्टवेअरला (Microsoft antivirus software) विंडोज डिफेंडर नावानेच संबोधतं. ऑपरेशन कवचकुंडल आहे तरी काय? नगर, सोलापूर, सातारा आणि पुण्यात रुग्ण वाढले सुरुवातीला बऱ्याच तज्ज्ञांनी मायक्रोसॉफ्टच्या या बिल्ट इन अँटी व्हायरस आणि अँटी मालवेअर सॉफ्टवेअरला कुचकामी म्हटलं होतं; पण आता अपडेट झालेलं विंडोज सिक्युरिटी (Updated Windows Security) हे सध्या प्रसिद्ध असणाऱ्या अव्हास्ट (Avast) आणि कास्परस्काय (Kaspersky) या अँटी व्हायरस सॉफ्टवेअर्सना तगडी टक्कर देत आहे. विंडोज सिक्युरिटी हे 99.7 टक्के थ्रेट्सना परतवून लावू शकतं. विंडोज सिक्युरिटी हा पर्याय सध्या केवळ ‘विंडोज 11’वर (Windows 11 antivirus) उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, इतर उपलब्ध अँटी मालवेअर सॉफ्टवेअर्सपेक्षा हा वापरण्यासाठी (How to use Windows Security) अगदीच सोपा आहे. हे वापरण्यासाठी तुम्हाला केवळ स्टार्ट मेन्यूमध्ये जाऊन ‘विंडोज सिक्युरिटी’ असं टाइप करायचं आहे. या व्यतिरिक्त, तुम्ही सेटिंग्ज – प्रायव्हसी अँड सिक्युरिटी – विंडोज सिक्युरिटी अशा मार्गानेही (Path to find Windows Security) हे सॉफ्टवेअर उघडू शकता. हे सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर तुमच्या पीसीचं सध्याचं स्टेटस काय आहे याची समरी (PC Status summary) तुम्हाला दिसेल. त्यावरून तुम्ही पुढील कृती ठरवू शकाल. यानंतर ‘ओपन विंडोज सिक्युरिटी’ (Open Windows Security) हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला संपूर्ण अॅप्लिकेशनचा अॅक्सेस मिळेल. विंडोजची बिल्ट इन सिक्युरिटी संपूर्ण कम्प्युटरला स्कॅन करील आणि काहीही आक्षेपार्ह डेटा आढळल्यास किंवा मालवेअर कॉम्युटरमध्ये येण्याचा प्रयत्न करताना आढळल्यास त्याला ब्लॉक करण्याचा प्रयत्न करील. BSNL Best Plans: `हे` आहेत बीएसएनएलचे अधिक सुविधा देणारे नवे ब्रॉडबँड प्लॅन्स विंडोजची ही सिक्युरिटी सिस्टीम आपोआप पीसी स्कॅन करत राहीलच; मात्र तुम्हाला कधी मॅन्युअली पीसीची (Windows Security Manual Scan) चाचणी करायची असेल, तर तसा पर्यायही उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला सर्वांत आधी 'विंडोज सिक्युरिटी'मध्ये जावं लागेल. त्यानंतर 'व्हायरस अँड थ्रेट प्रोटेक्शन' हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर 'क्विक स्कॅन' हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्या पीसीचं नॉर्मल स्कॅन पूर्ण होईल. तुम्हाला यापेक्षा जास्त डीप स्कॅन करायचं असेल, तर 'स्कॅन ऑप्शन्स' या पर्यायावर क्लिक करून 'फुल स्कॅन' (Windows Security full scan) हा पर्याय तुम्ही निवडू शकता; मात्र यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागेल. या स्कॅनवेळी विंडोजला एखादं मालवेअर आढळलं, तर त्यावर अॅक्शन घेण्यासाठी तुम्हाला 'स्टार्ट अॅक्शन्स' या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर हा मालवेअर ब्लॉक केला जाईल. अशा प्रकारे, कोणतंही थर्ड पार्टी सॉफ्टवेअर न घेता, केवळ विंडोजच्या मदतीने तुम्ही तुमचा कम्प्युटर सुरक्षित ठेवू शकता.
    First published:

    पुढील बातम्या