मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

BSNL Best Plans: `हे` आहेत बीएसएनएलचे अधिक सुविधा देणारे नवे ब्रॉडबँड प्लॅन्स; बघा संपूर्ण डिटेल्स

BSNL Best Plans: `हे` आहेत बीएसएनएलचे अधिक सुविधा देणारे नवे ब्रॉडबँड प्लॅन्स; बघा संपूर्ण डिटेल्स

बीएसएनएलने यापूर्वी मोबाइल युझर्ससाठी काही वैविध्यपूर्ण प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन लॉंच केले आहेत.

बीएसएनएलने यापूर्वी मोबाइल युझर्ससाठी काही वैविध्यपूर्ण प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन लॉंच केले आहेत.

बीएसएनएलने यापूर्वी मोबाइल युझर्ससाठी काही वैविध्यपूर्ण प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन लॉंच केले आहेत.

देशात खासगी आणि शासकीय टेलिकॉम कंपन्यांच्या (Telecom Companies) माध्यमातून मोबाइल कॉलिंग, डेटा, तसंच ब्रॉडबँड सेवा पुरवली जाते. सध्या अनेक खासगी टेलिकॉम कंपन्या आपली ग्राहकसंख्या वाढवण्यासाठी वैविध्यपूर्ण प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स सादर करत आहेत. अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएस यांसारख्या सुविधा या माध्यमातून देऊन ग्राहकांचं लक्ष वेधत आहेत. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम'(Work from home) करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याने या कंपन्यांनी ब्रॉडबँडचेदेखील (Best braodband service by BSNL) वैविध्यपूर्ण प्लॅन्स लॉंच केले आहेत. सरकारी टेलिकॉम कंपनी असलेली भारतीय संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने (BSNL) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, तसंच ग्राहकसंख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून नुकतेच ब्रॉडबँडचे (Broadband) विशेष प्लॅन लॉंच केले आहेत. या प्लॅन्समध्ये ओटीटी (OTT) सुविधादेखील दिली जाणार आहे. या प्लॅनविषयीची माहिती `झी न्यूज हिंदी`ने दिली आहे.

बीएसएनएलने यापूर्वी मोबाइल युझर्ससाठी काही वैविध्यपूर्ण प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन लॉंच केले आहेत. याच धर्तीवर आता इंटरनेट युझर्ससाठी काही विशेष ब्रॉडबँड प्लॅनदेखील लॉंच केले आहेत. बीएसएनएलच्या 749 रुपयांच्या प्लॅनमध्ये युझर्सना एका महिन्यासाठी 100 Mbps स्पीडने एकूण 1000 GB डेटा मिळणार आहे. हा डेटा संपला, की युझरला दिला जाणारा स्पीड 5 Mbps करण्यात येईल. तसंच युझर्सना या प्लॅनअंतर्गत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची (Unlimited Calling) सुविधा मिळणार आहे. तसंच सोनी लिव्ह प्रीमियम, झी 5, व्हूट सिलेक्ट आणि युप्प टीव्ही या ओटीटी प्लॅटफॉर्मची (OTT Platform) सबस्क्रिप्शन्सही दिली जाणार आहेत. या प्लॅनचा कालावधी एक महिन्याचा असून, हा प्लॅन सुरू करण्यापूर्वी युझर्सना सिक्युरिटी डिपॉझिट द्यावं लागणार आहे.

हे वाचा - PAN Card Update: पॅन कार्डवरचा तपशील अपडेट करायचाय? 'ही' आहे संपूर्ण प्रक्रिया

बीएसएनएलचा दुसरा ब्रॉडबँड प्लॅन 949 रुपयांचा आहे. यात युझर्सना बीएसएनएलकडून 2000 GB चा डेटा मिळेल. या डेटासाठी 150 Mbps स्पीड असेल. डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 10 Mbps केला जाईल. या प्लॅनमध्येदेखील युझर्सना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. ओटीटी सुविधेचा विचार करायचा झाल्यास, या प्लॅनअंतर्गत युझर्सना सोनी लिव्ह प्रीमियम, झी 5, व्हूट सिलेक्ट आणि युप्प टीव्ही या ओटीटी प्लॅटफॉर्मची सबस्क्रिप्शन्स दिली जाणार आहेत. या प्लॅनचा कालावधी एक महिन्याचा असेल. हा प्लॅन सुरू करण्यापूर्वी युझर्सना सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागेल.

बीएसएनएलने हे दोन्ही प्लॅन 5 ऑक्टोबरपासून सुरू केले असून, याचा लाभ अंदमान-निकोबार सोडून देशाच्या सर्व भागांतले युझर्स घेऊ शकतात. ब्रॉडबँड युझर्ससाठी हे प्लॅन निश्चितच एक चांगला ऑप्शन ठरू शकतात.

First published:

Tags: BSNL, Technology