मुंबई, 11 डिसेंबर: तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट 40 हजार रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही या किमतीत iPhone 13 विकत घेऊ शकता. आयफोनवर सध्या फ्लिपकार्टवर जबरदस्त ऑफर मिळत आहे. Apple ने 2021 मध्ये iPhone 13 सीरिज लाँच केली होती. 2022 मध्ये, iPhone 13 हा सर्वांत लोकप्रिय स्मार्टफोन बनला होता. आयफोन 13 ऑनलाइन मार्केटमध्ये जोरदार ट्रेंडिंग आहे. अशातच ऑनलाइन सेलमध्ये अनेक महागड्या फोनची किंमत खूपच कमी होते. iPhone 13 तुम्हाला फ्लिपकार्टवर अर्ध्या किमतीत खरेदी करता येईल. स्टॉक संपण्यापूर्वी तुम्ही हा फोन बुक करू शकता. आयफोन 13 किती कमी किमतीत खरेदी करता येईल ते जाणून घेऊयात.
Flipkart Sale: iPhone 13 ऑफर्स & डिस्काउंट्स-
आयफोन 13 ब्लू, 128 GB व्हेरियंट फोनची लाँचिंग किंमत 69,900 रुपये आहे, परंतु सध्या फ्लिपकार्टवर हा फोन 61,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्याशिवायही त्यावर अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होऊ शकते.
Flipkart Sale: iPhone 13 बँक ऑफर-
जर तुम्ही iPhone 13 खरेदी करण्यासाठी Flipkart Axis Bank चे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 5 टक्के म्हणजेच 3,100 रुपये कॅशबॅक मिळेल, त्यानंतर फोनची किंमत 58,899 रुपये होईल. त्यानंतर त्यावर एक्सचेंज ऑफरदेखील मिळत आहे.
हेही वाचा: लॅपटॉप घेण्याआधी फक्त एक गोष्ट चेक करा; तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल
Flipkart Sale: iPhone 13 एक्सचेंज ऑफर-
iPhone 13 वर 20 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. तुम्ही तुमचा जुना आयफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला इतकी सूट मिळू शकते. पण तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असेल आणि लेटेस्ट मॉडेल असेल तरच तुम्हाला 20 हजारांचं डिस्काउंट मिळेल. तुम्ही पूर्ण 20 हजारांची एक्सचेंज ऑफर मिळवल्यास आय फोनची किंमत फक्त 38,899 रुपये असेल. तुम्ही एवढे पैसे देऊन तो फोन विकत घेऊ शकता.
iPhone घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. पण हा फोन महाग असल्याने अनेकांना तो घेता येत नाही. पण आता फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या ऑफर्समुळे तो निम्म्या किमतीत मिळतोय, त्यामुळे ही आयफोन घेण्याची चांगली संधी आहे. तुम्ही विचार करत असाल तर कोणती ऑफर तुम्हाला लागू होते पहा आणि व्हा आयफोनचे मालक.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Discount offer, Flipkart, Iphone