भारतीय वंशाची गीतांजली राव ठरली Kid of the Year, 15 वर्षांची चिमुरडी TIMEच्या सन्मानाची पहिली मानकरी

भारतीय वंशाची गीतांजली राव ठरली Kid of the Year, 15 वर्षांची चिमुरडी TIMEच्या सन्मानाची पहिली मानकरी

गीतांजलीची 5 हजार नामांकनातून निवड झाली. हॉलीवूड अभिनेत्री अँजेलीना जोलीने तिची मुलाखत घेतली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक पातळीवर सामाजिक समस्यांवर कशी मात करता येईल याबाबत गीतांजली विचार करते.

  • Share this:

वॉशिंग्टन, 4 डिसेंबर : भारतीय-अमेरिकन असलेल्या गीतांजली राव (Gitanjali Rao) या 15 वर्षांच्या मुलीने या वर्षाचा पहिल्या ‘टाईम्स किड’चा (TIME’s first-ever Kid) बहुमान पटकावला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी प्रदूषण (Water Pollution) ते औषधांचं व्यसन (Opioid Addiction)आणि सायबर बुलींग अशा विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तिने काम केलं आहे. यासाठी‘टाईम्स’ने सन्मानाने तिचा गौरव केला आहे.

कोलोरॅडो येथे राहणाऱ्या गीतांजलीची 5 हजार नामांकनातून निवड झाली. हॉलीवूड अभिनेत्री अँजेलीना जोलीने (ANGELINA JOLIE) तिची मुलाखत घेतली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक पातळीवर सामाजिक समस्यांवर कशी मात करता येईल याबाबत गीतांजली विचार करते.

‘टाईम’शी बोलताना तिने सांगितलं की, वयाच्या दहाव्या वर्षी तिने पहिल्यांदा आपल्या पालकांना कार्बन नॅनोट्यूब सेन्सर टेक्नोलॉजीवर (carbon nanotube sensor technology) ती संशोधन करत असल्याचं सांगितलं. ते ऐकून तिची आई चांगलीच बुचकळ्यात पडली होती.

वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी गीतांजलीने ‘डिस्कव्हरी एज्यूकेशन 3 एम सायंटिस्ट चॅलेंज’ (Discovery Education 3M Scientist Challenge) ही स्पर्धा जिंकली होती. तिच्या संशोधनासाठी फोर्ब्सच्या (Forbes)30 वर्षांच्या आतील 30 जणांच्या यादीत तिचा (30 Under 30) समावेश झाला होता.

(वाचा - 27 वर्षांपूर्वी गोठवून ठेवलेल्या भ्रूणातून दिला चिमुरडीला जन्म)

आता गीतांजलीने नवीन अॅप विकसित केलं असून, त्याचं नाव ‘काईन्डली’(Kindly) असं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial intelligence) आधारीत हे अॅप सायबरबुलींगचा (cyberbullying) शोध घेतं. तसंच तिने ‘टेथिस’ (Tethys) नावाचं एक उपकरण तयार केलं असून ते कार्बन नॅनोट्यूबच्या मदतीने पाण्यातील शिशाचं प्रमाण शोधून काढते.

सध्या ती वेदनाशामक औषधांचं व्यसन शोधून काढून म्यु-ओपाईड रिसेप्टर जनुकाद्वारे (mu-opioid receptor gene)होणाऱ्या प्रोटीन उत्पादनावर आधारीत हे संशोधन करत आहे. 2018 मध्ये तिने अमेरिकेतील मानाचा, पर्यावरण संरक्षण संस्था प्रेसिडेंट एन्व्हायर्नमेंटल युथ पुरस्कार (President’s Environmental Youth Award) मिळवला होता.

‘टाईम’ला (TIME) दिलेल्या मुलाखतीत गीतांजली म्हणाली, मला टिपिकल सायंटिस्ट आवडत नाहीत. मी टीव्हीवर पाहते ते सायंटिस्ट सगळे गोरे, वयस्क असतात. ते बघून लिंग, वर्ण, रंग यावर जणू लोकांना त्याचं काम ठरवून दिलं आहे, असं वाटतं. मी हे काम करू शकते तर तुम्हीही ते करू शकता, कोणीही ते करू शकते.’

गीतांजली एमआयटी टेक रिव्ह्यूची (MIT Tech Review) वाचक आहे. ‘तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एमआयटी, हॉर्वर्डचे संशोधक नाविन्यपूर्ण संशोधन करत आहेत, ते वाचायला खूप छान वाटतं. त्यातून खूप प्रेरणा मिळतं, असंही तिने सांगितलं. जेनेटीक्समध्ये (Genetics) प्रचंड आवड असलेल्या गीतांजलीला एमआयटीमधून (MIT) जेनेटीक्स आणि साथ रोग (Epidemiology) या विषयांमध्ये शिक्षण घ्यायचं आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: December 4, 2020, 1:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या