Indian Air Force: A cut above- हवाई दलाचा Game लाँच, असा करा डाऊनलोड!

Indian Air Force: A cut above- हवाई दलाचा Game लाँच, असा करा डाऊनलोड!

भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) एअर कॉम्बेट गेम (Air Combat Game) लाँच केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 जुलै: भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) एअर कॉम्बेट गेम (Air Combat Game) लाँच केला आहे. काही महिन्यापूर्वी पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्ताननेही एफ - 16 विमानांनी हवाई हल्ला केला, पण भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतवून लावत पाकिस्तानचं एफ - 16 विमान पाडलं. या मोहिमेचा हिरो ठरलाहोता विंग कमांडर अभिनंदन होय. आता हवाई दलाने तयार केलेल्या या गेममुळे तुम्ही स्वत: मिग-21 विमान उडवू शकाल.

बुधवारी हवाई दलाचे प्रमुख बीरेंद्र सिंह धनोआ यांनी Air Combat Game लाँच केला. हा गेम Android आणि iOS या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमवर खेळता येऊ शकतो. हवाई दलाने याचा टीझर 20 तारखेलाच रिलीझ केला होता. टीझरमध्ये विंग कमांडर अभिनंदन यांना दाखवण्यात आले होते. या गेममध्ये युझर स्वत: पायलट असतील आणि विमानाचे सर्व कंट्रोल म्हणजेच ऑन-स्क्रीन बटन तुमच्याकडे असतील. गेमच्या सुरुवातीला ट्रेनिंग सेशन देखील आहे. यामध्ये एअरक्राफ्ट कसे चालवायचे याची माहिती देण्यात आली आहे.

Indian Air Force: A cut above असे या गेमचे नाव आहे. हा गेम केवळ मोबाईलसाठी तयार करण्यात आला आहे. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता. गेममध्ये प्रशिक्षण, सिंगल प्लेअर आणि फ्री फ्लाईटचा समावेश आहे. विशेष म्हणजे या गेममध्ये राफेल विमानांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राफेल सोबतच सुखोई 30 MKI, मिग 29, मिराज 2000 या विमानांचाही समावेश आहे.

हा व्हिडिओ गेम सध्या तरी एकच जण खेळू शकतो पण लवकरच हा गेम एकाच वेळी अनेक जण खेळू शकतील असा मल्टीप्लेअर मोड जोडला जाणार आहे. भविष्यात येणाऱ्या लढाऊ विमानांबद्दलही युजरला माहिती मिळू शकेल.

VIDEO :..तेव्हा शिवसेना कशी फोडली? चंद्रकांत पाटलांचं पवारांना जशास तसे उत्तर

Published by: Akshay Shitole
First published: July 31, 2019, 5:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading